एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कुठे आहे सध्या ‘ही’ अभिनेत्री? जाणून घ्या या काही गोष्टी…

अनेक मराठी अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी ८०-९० चे दशक आपल्या अभिनयाने गाजवले होते. मात्र आता त्या फारशा कुठे दिसत नाहीत. अशीच एक अभिनेत्री आहे जिने मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करत आपल्या अभिनयाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. या अभिनेत्रीचे नाव आहे रेखा राव. रेखा यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच काही हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

धरलं तर चावतंय, प्रेम करूया खुल्लमखुल्ला, शुभ मंगल सावधान, आमच्यासारखे आम्हीच असे अनेक मराठी चित्रपट रेखा राव यांनी साकारले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, वर्षा उसगावकर यांसारख्या गाजलेल्या कलाकारांबरोबर काम करताना त्या कुठेही कमी पडल्यासारख्या किंवा दाबल्यासारख्या वाटत नाहीत. आपल्या अभिनय शैलीने त्यांनी रसिकांची माने जिंकून घेतली आहेत.

अभिनेत्री रेखा राव या मूळच्या बंगलोरच्या राहणाऱ्या. नृत्याची आवड असल्याने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. अनेक मंचावर त्यांनी आपली नृत्यकला सादर केली आहे. एकदा त्यांना हिंदी अभिनेते किशोर कुमार यांच्यासमोर आपली नृत्यकला सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी असे काही घडले की त्यामुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांना या घटनेनंतर अभिनयाची गोडी लागली.

मराठी बोलता येत असल्याने सुरुवातीला त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख नायिकेची भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप पडली. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये रेखा यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर काम केले आहे.

हळूहळू त्यांनी आपला मोर्चा हिंदी चित्रपटांकडे वळवला. हम दिल दे चुके सनम (१९९९), तेहजीब (२००३), हिरोज (२००८) यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या. ‘हम दिल दे चुके सनम’ मधील त्यांच्या नकारात्मक भूमिकेचे विशेष कौतुक झाले.

कधी सहाय्यक व्यक्तिरेखा म्हणून, तर कधी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकेत रेखा राव यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर ‘शुभ विवाह’ या मालिकेत देखील त्यांनी काम केले आहे. सध्या रेखा बंगलोर मध्ये आपल्या कुटुंबाबरोबर रहात आहेत.

 

मराठी आणि हिंदी इंडस्ट्री मधून ब्रेक घेऊन त्या सध्या आपली ट्रॅव्हलिंग आणि डान्सची आवड जोपासताना दिसत आहेत. सध्या त्या दाक्षिणात्य चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहेत. त्यांच्या या सेकंड इनिंग साठी त्यांना आमच्या टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा!

You might also like