एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ही छोटी प्रिया बापट पाहिली का? राजेश्वरी खरातचा बोल्ड अंदाज लावतोय सगळ्यांना वेड..

सोशल मीडिया वर प्रचंड सक्रीय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री राजेश्वरी खरात. ती नेहमी आपले डान्स व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत असते. तसेच तिचे विविध फोटोशूटमधील फोटो देखील ती नेहमी शेअर करताना दिसते. तिचे हे डान्स व्हिडिओ आणि फोटो आपल्याला कायम व्हायरल होताना दिसतात. तिचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे ती नेहमीच चालू ट्रेंड्स फॉलो करताना दिसते. आता देखील तिने शेअर केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

तिने जरी या नव्या व्हिडिओ मध्ये डान्स केला असला तरी या डान्सबरोबरच ती अजून एका कारणासाठी चर्चेत आहे. सध्या इंस्टाग्राम वर ट्रेंडिंग असणाऱ्या ‘टच इट’ या इंग्रजी गाण्यावर तिने डान्स केला आहे. मात्र हा डान्स आणि तिच्या अदा चाहत्यांना खूपच घायाळ करताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

लाल शॉर्ट वन पिस ड्रेस मध्ये राजेश्वरी खूपच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे. तिच्या अदा पाहताना आणि तिचा लूक बघून चाहत्यांना तिच्यात प्रिया बापटचा भास होत आहे. ‘छोटी प्रिया बापट’ असे तिचे चाहते तिला या व्हिडिओ नंतर म्हणू लागले आहेत.

तिचे हे कातिल अंदाज बघून चाहत्यांनी तिच्या या पोस्ट वर कमेंट्सचा पूर आणला आहे. ‘आता जीव घेणार का?’, ‘शालू तू खूप बदललीस’, ‘खूप हॉ’ट दिसत आहेस’, ‘मस्त’, ‘कडक ना भाऊ’, ‘कडक डान्स’, ‘जलवा आमच्या ताईचा’ अशा भन्नाट कमेंट्स राजेश्वरीच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्ट वर केल्या आहेत. तिने घातलेला लाल ड्रेस तिला खूपच शोभून दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉ’ट दिसत आहे. केसांची हाय पोनीटेल आणि तिच्या ड्रेसला साजेसा मेकअप यामुळे तिचा लूक खूप उठून दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ चित्रपटातून राजेश्वरी ‘शालू’ च्या रूपात सगळ्यांसमोर आली. या चित्रपटात ती अत्यंत साधी गावरान मुलगी दाखवली होती. मात्र स्वतःत बदल करत राजेश्वरीने स्वतःला ती शालूपेक्षाही अजून काहीतरी आहे हे सिद्ध केलंय.

त्यानंतर तिचा ‘आयटमगिरी’ (२०१७) चित्रपट प्रदर्शित झाला. नुकताच तिच्या ‘रेडलाईट’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. राजेश्वरीने जरी फार चित्रपटांमध्ये काम केलं नसलं तरी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून ती नेहमीच चाहत्यांच्या भेटीला येत असते.

You might also like