एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘शालू’ च्या स्विम सूट ने लावली पाण्यात आग! राजेश्वरी खरात चा बोल्ड लूक व्हायरल…

२०१३ साली नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या बालकलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. एका छोट्या गावात जातीव्यवस्थेवरून घडणाऱ्या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. सोमनाथ आणि राजेश्वरी यांच्या ‘जब्या’ आणि ‘शालू’ या भूमिकांचं कौतुक झालं. हे दोन्ही कलाकार या चित्रपटामुळे नावारुपास आले.

‘फँड्री’ मध्ये सगळ्या कलाकारांच्या वेशभूषा या गावरान होत्या. खऱ्या आयुष्यात मात्र हे लोक खूपच मॉडर्न आहेत. आता ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरातलाच बघा. ती नेहमी सोशल मीडिया वर सक्रीय असते.

सोशल मीडिया च्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी आपल्या अकाऊंट वरून काही ना काही शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले असता लक्षात येईल की ती स्वतःचे खूप सारे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

या सगळ्याच फोटो आणि व्हिडिओ मधून तिचा मॉडर्न लूक खुलून दिसतो. तिच्या फोटो आणि व्हिडिओ ला खूप लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. तिने नुकतेच आपले काही फोटो शेअर केले आहेत जे खूपच व्हायरल होत आहेत.

असे कोणते फोटो आहेत हे? हे फोटो आहेत स्विम सूट मधल्या राजेश्वरीचे. या फोटोंमध्ये राजेश्वरी स्विमिंग पूल मध्ये उभी आहे. तिच्या लाल रंगाच्या स्विमिंग सूट ने पाण्यातच आग लावल्याचा भास होतो आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

तिच्या या बोल्ड आणि हॉट लूकचे तिचे चाहते खूप कौतुक करत आहेत. ‘आज ब्लू है पानी पानी’ या गाण्यावर ती स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना देखील दिसत आहे. एकूणच काय, तर तिच्या या जलव्याने तिने पाण्यातही आग लावून टाकली आहे. चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स चा तिच्या या फोटोंवर पाऊस पडत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज लोकांना भलताच आवडून गेल्याचं चित्र आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

राजेश्वरीचे हे फोटो लोकांनी खूप पसंत केले असले तरी बऱ्याचदा तिला लोकांनी तिच्या पोस्ट्स वरून ट्रोल देखील केले आहे. सगळ्यांनाच तिचा अंदाज आवडेल असं नाही. पण चुकीच्या कमेंट्स ना राजेश्वरीने योग्य वेळी सडेतोड उत्तरेही दिली आहेत.

अशा या राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ (२०१७) या चित्रपटात देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती. तिने अलीकडेच तिचा नवीन चित्रपट ‘रेड लाईट’ चे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर केले होते.

You might also like