एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राजेश्वरी खरातची शेतात सैर! व्हिडिओ झाला व्हायरल…

अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या इंस्टाग्राम स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. ती नेहमी इंस्टाग्राम वर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटो आणि व्हिडिओज ना खूप प्रसिद्धी मिळत असते. तिचे चाहते तिच्या या व्हिडिओ आणि फोटो वर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव करत असतात. अनेकदा ती तिचे डान्स व्हिडिओ देखील अपलोड करत असते. नुकताच तिने तिचा शेतातला व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला लोकांनी खूप पसंती दिली आहे.

या व्हिडिओ मध्ये राजेश्वरी शेतात फिरताना दिसत आहे. तिने नारंगी रंगाची साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या रुपाला प्रचंड पसंती दर्शवली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटात राजेश्वरीने ‘शालू’ ची भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

नागराज यांनी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ‘शालू’ ची भूमिका राजेश्वरी करणार हे नक्की झाले होते. मात्र बऱ्याच प्रयत्नांनी त्यांना राजेश्वरी सापडली. पण तिच्या घरचे तिला चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी देत नव्हते. बरीच समजूत काढल्यानंतर त्यांनी तिला परवानगी दिली आणि त्यानंतर जे घडले ते तर सर्वांना माहीत आहेच.

राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे, की हे सगळे जे दिसते आहे ते त्यांचे शेत आहे आणि ती खूप दिवसांनी शेतात आली आहे. या व्हिडिओ सोबत तिने लिहिले आहे, की आजोबा हयात होते तेव्हा ती त्यांच्याबरोबर एकदा शेतात आली होती. आता बऱ्याच काळानंतर ती त्या शेतात परत आली आहे. त्यानंतर बऱ्याच काळानंतर ती गावात आली आहे. शेतात फिरताना आजोबांसमवेतच्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्याचे ती सांगते. हा विडिओ सोशल मीडिया वर बराच व्हायरल झाला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)

राजेश्वरीने ‘फँड्री’ नंतर ‘आयटमगिरी’ या चित्रपटातदेखील काम केले होते. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत पुण्यात राहते. ‘फँड्री’ चित्रपटात तिने जरी एका गावातील मुलीची भूमिका निभावली असली, तरी प्रत्यक्षात मात्र ती खूपच ग्लॅमरस आहे. आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो देखील ती चाहत्यांबरोबर सोशल मीडिया वर शेअर करत असते.

आपल्या आवडत्या कलाकारांचे असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत राहा. तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like