एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पंतप्रधानांना राज ठाकरे यांच्याकडून पत्र: महाराष्ट्रासाठी पंतप्रधानांकडे केल्या या मुख्य मागण्या..

महाराष्ट्र मध्ये वाढते सं’कट पाहून आता महाराष्ट्र शासनाने अनेक नि’र्बंध लावले आहेत. अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प पडले आहे. त्यामध्येच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक मागण्या केल्या आहेत.

राज्यातील करो’ना परिस्थीती लक्षात घेता अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना हे पत्र लिहले आहे. या मध्ये त्यांनी लसीकरण लवकरात लवकर करायला पाहिजे असे मत वक्त केले आहे. त्याशिवाय स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या आणि रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असावा यासाठी राज्याला मोकळीक द्यावी अशी हि मागणी त्यांनी या पत्रद्वारे केली आहे.

अ) राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या.

ब) राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.

क) ‘सीरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करुन लस विक्रीची परवानगी द्यावी.

ड)लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिक लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.

इ) को’विड-19 रो’गाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

महाराष्ट्रातील को’व्हिडचा वाढत्या प्रादुर्भावावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधी मा.राजसाहेब ठाकरे ह्यांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना एक पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत. (source: https://twitter.com/mnsadhikrut)

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like