एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुक्काम पोस्ट तुरुंग! अटकेनंतर पहिल्यांदाच समोर आले राज कुंद्रा चे फोटो…

सोमवारी रात्री उशिरा राज कुंद्रा ला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच ने अटक केली. अश्लील चित्रपट निर्मिती करणे तसेच ते एका ऍप च्या माध्यमातून प्रदर्शित करणे या गुन्ह्यांखाली बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा ला अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये या प्रकरणी कुंद्रा वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सबळ पुरावे हाती आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

राज कुंद्राला या प्रकरणी न्यायालयाने २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी ची शिक्षा सुनावली आहे. हे अश्लील चित्रपट अपलोड करणाऱ्या उमेश कामतला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Third party image reference

राज कुंद्रा च्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे याला देखील रायगड येथून अटक करण्यात आली. रायन चे राज आणि शिल्पा यांच्या बरोबर खूप जवळचे संबंध आहेत.

अभिनेत्री गहना वसिष्ठ ला पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अटक झाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचे धागेदोरे गोळा करत होते. यातला एक धागा त्यांना र्रज कुंद्रा पर्यंत घेऊन गेला आणि त्याचे रूपांतर राज कुंद्रा च्या अटकेत झाले.

Third party image reference

पतीच्या अटकेनंतर शिल्पा ने आपल्या ‘सुपर डान्सर’ या डान्स रिऍलिटी शो च्या चित्रीकरणाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर अजून नवी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही व्यायसायिक राज कुंद्रा ची दुसरी बायको आहे. मीडिया पासून लांब असलेला राज कुंद्रा शिल्पा बरोबर लग्न झाल्यानंतर बराच चर्चेत राहू लागला. त्याबरोबरच त्याच्याशी संबंधित वादही आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. राज कुंद्राला अटक झालेल्या पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणाच्या चौकशी अंती अनेक गोष्टी बाहेर येतील.

Third party image reference

तोपर्यंत राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत राहण्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातली काही नावे समोर आली आहेत. अधिक चौकशीनंतर अजूनही काही नवीन नावे समोर येण्याची शक्यता आहे.

शिल्पा शेट्टीचे भाजप नेत्यांशी खूप चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. मात्र या प्रकरणात कुणीच तिच्या मदतीला धावून येत नसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाबद्दल अजून गोष्टींचा छडा लागेल अशी आशा करायला हरकत नाही. शिल्पाने या आठवड्यातील ‘सुपर डान्सर’ च्या चित्रीकरणाला दांडी मारली असली तरी पुढे किती दिवस ती या गोष्टी सुरू ठेऊ शकेल याबद्दल संभ्रम आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.

You might also like