एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ! दोन ऍप्स वरून ५१ पो’र्न फिल्म्स जप्त..

प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे दिसत आहे. राज कुंद्राला पो’र्न फिल्म्स निर्मिती प्रकरणी १९ जुलै २०२१ रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्याच्याबरोबर त्याचा मित्र रायन थोर्पे ला अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.

२३ जुलै पर्यंत या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी अजून चार दिवस वाढून २७ जुलै पर्यंत करण्यात आली. सध्या हे दोघे १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आता या प्रकरणात एक नवी बाब समोर आली आहे.

राज कुंद्रा आणि त्याचा मित्र रायन थोर्पे या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आल्या नंतर राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीची देखील कसून तपासणी होत आहे. या तपासणीतून रोज नव्या गोष्टी जगासमोर येत आहेत.

आता देखील मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या दोन ऍप्स वरून ५१ पो;र्न फिल्म्स जप्त केल्या आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या बातमीनुसार सरकारी वकीलांनी मुंबई हायकोर्टाला या जप्त केलेल्या ५१ पो;र्न फिल्म्स बाबत कळवले आहे. सरकारी वकील अरुणा पै यांनी हायकोर्टात सांगितले की राज कुंद्राच्या दोन ऍप्स वरून या फिल्म्स मिळाल्या असून यांचा राज कुंद्राशी थेट संबंध आहे.

सरकारी वकीलांनी या प्रकरणी राज कुंद्रा आणि रायन थोर्पे या दोघांच्या अटकेची मागणी केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाला सांगितले, की राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांच्यावर अ’श्लील कंटेन्ट स्ट्रीमिंग चा गंभीर आ’रोप असून पोलिसांनी फोन आणि स्टोरेज डिव्हाईस मधून कंटेन्ट जप्त केला आहे.

सरकारी वकीलांनी पुढे हेही सांगितलं, की राज कुंद्राने त्याच्या हॉ’ट’शॉ’ट्स ऍप वरून लंडनमधील एका कंपनीचा मालक असलेला त्याचा मेव्हणा प्रदीप बक्षीला एक इमेल देखील केला होता.

अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले, की अ’श्लील व्हिडिओ आणि कंटेन्ट व्यतिरिक्त पेमेंट अमाऊंट आणि इतर माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांच्यावर गुन्हे शाखेने भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ३४ (सामूहिक हेतू), २९२ व २९३ (अ’श्लीलता व अभद्रता) यांसह माहिती कायद्याच्या (Information Act) संबंधित कलमांतर्गत गु’न्हे दाखल करण्यात आले आहेत.

You might also like