एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राज कुंद्राच्या संपत्तीचा आकडा ऐकून धक्का बसेल! कित्येक हजार कोटींच्या घरात आहे त्याची एकूण संपत्ती..

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी सोमवारी म्हणजेच १९ जुलै २०२१ रोजी रात्री उशिरा अटक केली. पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिसांनी या प्रकरणी गहना वसिष्ठ या अभिनेत्रीला अटक केल्यानंतर पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरूनच त्यांना उद्योगपती राज कुंद्राच्या विरोधात पुरावे मिळाल्याने ही अटक झाली आहे.

राज कुंद्रा हे उद्योग जगतातलं एक प्रतिष्ठित नाव. कमाईच्या बाबतीत म्हणाल तर त्यातही राज कुंद्रा हे नाव अगदी टॉपला आहे. राज कुंद्रा लंडनमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला. मात्र त्याचे मूळ गाव पंजाब मधील लुधियाना हे आहे. राजची आई एका स्टोअर मध्ये सहाय्यक म्हणून काम करायची. त्याचे वडील लंडन मध्ये बस कंडक्टर होते. शिक्षणात फारसा रस नसल्याने राजने शिक्षण अर्धवट सोडले. त्याच्या वडीलांनी त्याला काहीतरी काम कर असे सांगितल्यावर तो व्यवसायाकडे वळला.

काही पैसे घेऊन तो नेपाळला पोहोचला. तेथे त्याने पश्मिना शालींचा व्यवसाय निवडला. व्यायसायिक असल्याने त्याची अनेक कलाकारांबरोबर ओळख होती. त्या पश्मिना शाली त्याने या कलाकारांना विकायला सुरुवात केली. या व्यवसायाने त्याला बरीच बरकत दिली. या यशामुळे त्याने इतर देशांमध्ये देखील वेगवेगळे व्यवसाय करण्यास सुरुवात केली. दुबईत त्याने हिऱ्यांचा व्यवसाय सुरू केला मात्र त्यात त्याला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. एकीकडे आपला शालींचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू ठेवत पुन्हा हिऱ्यांच्या व्यवसायात उडी घेतली. यावेळी मात्र तो यशस्वी झाला.

राज कुंद्राने अनेक व्यवसायांमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले आहे. स्टील प्लान्ट, कन्स्ट्रक्शन, रियल इस्टेट, फॅशन इंडस्ट्री, फॉरेन इन्व्हेस्टमेंट अशा अनेक व्यवसायांमध्ये त्याने आपले बस्तान बसवले आहे. राज विविध खेळांतील टीम्स विकत घेतो आणि त्यांना स्पॉन्सर करतो. त्यातून होणारी त्याची कमाई ही अनेक हजार कोटींच्या घरात आहे. भारत, ब्रिटन, दुबई यांसारख्या अनेक देशांमध्ये त्याच्या व्यवसायांचे जाळे पसरले आहे.

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, राज कुंद्राचे वार्षिक उत्पन्न १०० मिलियन डॉलरच्या वर आहे. शिल्पा शेट्टीपॆक्षा त्याची कमाई कित्येक पटींनी जास्त आहे. ब्रिटनमधील श्रीमंत लोकांच्या यादीत त्याला १९८ वे स्थान मिळाले आहे. एका रिपोर्टनुसार राज कुंद्राचे वार्षिक उत्पन्न २०१७ मध्ये २३०० कोटी, २०१९ मध्ये २३५० कोटी, २०२० मध्ये २५०० कोटी तर २०२१ मध्ये २९०० कोटी इतके आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.

You might also like