एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बस कंडक्टरच्या मुलाची २९०० कोटींची संपत्ती! कसा बनला राज कुंद्रा एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या..

सध्या चर्चेचा विषय ठरलेली घटना म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला झालेली अटक. आपल्या अनेक व्यवसायांतून करोडो कमावणारा राज कुंद्रा याला सोमवारी रात्री उशिरा अश्लील चित्रपट निर्मिती करणे आणि एका ऍप द्वारे ते प्रदर्शित करणे या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली.

फेब्रुवारी २०२१ मध्ये पोर्न फिल्म रॅकेट मध्ये एका अभिनेत्रीला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या हाती अनेक धागेदोरे आले आणि त्यातून राज कुंद्राला अटक झाली आहे. पण हा राज कुंद्रा नक्की आहे तरी कोण?

शिल्पा शेट्टीसोबत लग्न होण्यापूर्वी राज कुंद्रा हे नाव फारसे परिचित नव्हते. मात्र या दोघांच्या लग्नानंतर राज कुंद्राला बरीच प्रसिद्धी मिळाली. या दोघांचे टिकटॉक व्हिडिओ आणि इन्स्टा रील्स खूप व्हायरल होतात.

शिल्पा शेट्टी राज कुंद्राची दुसरी बायको असून राजच्या पहिल्या बायकोचे नाव कविता होते. कविता आणि राजला डीलीना नावाची एक मुलगी आहे. २००९ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. शिल्पाची राजच्या आयुष्यातली एन्ट्री हीच या घटस्फोटाचे कारण असल्याचे बोलले जात होते.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी लग्न करून आपला सुखी संसार सुरू केला. या दोघांना यथावकाश दोन मुले, अनुक्रमे एक मुलगा आणि एक मुलगी, देखील झाले. राज कुंद्राचे वडील मूळचे पंजाबमधील लुधियानाचे. मात्र हे सर्वसामान्य कुटुंब लंडनला शिफ्ट झाले आणि तिथेच राज कुंद्राचा जन्म झाला.

त्यामुळे राज कुंद्रा हा एक ब्रिटीश नागरीक आहे. राज कुंद्राचे वडील लंडनमध्ये बस कंडक्टरचे काम करत. त्याची आईदेखील एका स्टोअर मध्ये काम करत असे.

प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या राज कुंद्राने आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडले. व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडे पैसे घेऊन तो नेपाळला गेला आणि तिथे त्याने पश्मिना शाली विकत घेऊन युनायटेड किंगडम मध्ये विकण्यास सुरुवात केली. या व्यवसायात त्याला खूप यश मिळाले.

२००४ साली एका रिपोर्ट नुसार राज कुंद्रा यांना त्यावर्षी ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रवेश मिळाला. राज कुंद्रा या यादीत १९८ व्या स्थानावर होते. राज कुंद्राचे अनेक उद्योग आहेत. सध्या चर्चेत असलेल्या अश्लील चित्रपट निर्मिती मधून देखील त्याने बरीच कमाई केली असल्याचे बोलले जाते. सध्याची राज कुंद्राची वार्षिक कमाई ही जवळपास २९०० कोटी असल्याचे कळते.

You might also like