एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फोटोमधल्या या चिमुरडीला ओळखले का? आज आहे आघाडीची अभिनेत्री…

मंडळी, या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी कोण आहे, हे तुम्हाला ओळखता आले का? इतक्या लहान मुलीचा फोटो बघून ती नक्की कोण आहे, हाच प्रश्न तुम्हाला पडला आहे ना? हा फोटो आहे सध्याच्या घडीच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्रीचा. नुकताच या अभिनेत्रीचा वाढदिवस झाला आहे. आता तरी समजले का की हा फोटो कोणत्या अभिनेत्रीच्या लहानपणीचा आहे? हा फोटो आहे राधिका आपटे या अभिनेत्रीचा.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

७ सप्टेंबर १९८५ रोजी राधिकाचा जन्म झाला. मराठी असली तरी राधिकाने हिंदी मनोरंजन सृष्टीतच जास्त काम केलं आहे. वेब सिरीज साठी तर राधिका आपटे हे नाव अगदी घरचेच झाले आहे. हिंदी बरोबरच तिने काही तमिळ, मल्याळम, मराठी, बंगाली, तेलगू आणि इंग्रजी भाषिक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

नाटकांपासून सुरुवात करत राधिकाने ‘वाह! लाईफ हो तो ऐसी!’ (२००५) या चित्रपटात एक छोटी भूमिका करत आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

insta/Radhika Apte
insta/Radhika Apte

राधिकाचा जन्म तामिळनाडू मध्ये झाला आहे. तिचे आई आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत. राधिकाने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून अर्थशास्त्र आणि गणित विषयांत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. रोहिणी भाटे यांच्याकडे राधिकाने ८ वर्षे कथकचे शिक्षणही घेतले आहे.

राधिका जरी पुण्यात राहत असली तरी तिने कोणत्याही शाळेतून शिक्षण घेतलेले नाही. तिला तिच्या आईवडिलांनी घरीच शिक्षण दिले आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. वर्षभर लंडनमध्ये राहून तिने कंटेम्पररी डान्सचे देखील प्रशिक्षण घेतले आहे.

insta/Radhika Apte
insta/Radhika Apte

२०११ मध्ये लंडन मध्येच तिला बेनेडिक्ट टेलर भेटला. दोघे लिव्ह इन रि’लेश’नशिपमध्ये होते. २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले. राधिकाने अनेक इंग्रजी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. तिने बऱ्याच वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्स देखील केल्या आहेत. रक्तचरित्र, शोर इन द सिटी, तुकाराम, लई भारी, बदलापूर, हंटर, मांझी- द माऊंटन मॅन, फोबिया, कबाली, पॅडमॅन, रात अकेली है यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला तिचा उत्तम अभिनय बघायला मिळतो.

काय मग मंडळी, कशी वाटली राधिका आपटे बद्दलची ही माहिती? आम्हाला माहीत आहे, की यातील बरीच माहिती तुम्हाला नव्याने समजली आहे. सेलिब्रेटींबद्दलची अशीच नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. राधिका बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like