एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

“अजुनही बरसात आहे” या मालिकेत मनस्विनी ची भुमिका साकारतीये ही अभिनेत्री; जाणुन घ्या तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल..

हल्ली प्रत्येक घराघरांत टेलिव्हिजन हमखास आहे. विशेष म्हणजे या टेलिव्हिजन वर बरेच शो येत असतात. अलीकडच्या काही काळात लोकांचा टी. व्ही. सिरियल बघण्याकडे कल वाढलेला आहे.

आज या माध्यमायध्ये वेगवेगळे शो देणारी अनेक लोकप्रिय चॅनेल्स आपल्या सगळ्यांनाच माहीतीयेत. सध्या लाॅक;डाऊनमध्ये तर अनेक प्रेक्षकांसाठी सिरियल म्हणजे पर्वणीच ठरत आहे.

त्यातही अलिकडे बऱ्याच नवीन सारियल येतायत आणि लोकं त्याला तितकाच भरभरून प्रतिसाद देतायत. सध्या सोनी मराठी या चॅनेलवर अशीच एक मालिका लोकांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे.

या मालिकेचं नाव “अजुनही बरसात आहे” असं असुन यामध्ये लीड रोलला स्टार कास्ट आहेत. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यामध्ये मुख्य भूमिका करताना आपल्याला दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Purva Amogh Phadake (@kaushikpurva14)

उमेश – मुक्ता ही जोडी फार कालावधीनंतर एकत्र काम करतायत. या मालिकेत दाखवला गेलेला विषय लोक अत्यंत आवडीने पाहतायत. उमेश – मुक्ता बरोबरच या मालिकेत बाकीचे पात्रही गाजत आहेत. यामध्ये मनस्विनी नावाचं एक पात्र आहे. हे पात्र साकारणारी अभिनेत्री कोण आहे आणि ती खऱ्या आयुष्यात कशी आहे याविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत.

“अजुनही बरसात आहे” मध्ये मनु अर्थात मनस्विनी ची भुमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे खऱ्या आयुष्यातील नाव आहे पूर्वा कौशिक. पूर्वा एक उत्तम अभिनेत्री असून सध्या या मालिकेतही ती चांगल्या पद्धतीने मनस्विनीची भूमिका पार पाडताना दिसत आहे. याचमुळे सोशल मिडियावर तिचेही अनेक चाहते वाढत आहेत. पूर्वा कोशिक ही मुळची अंबरनाथ येथील राहणारी असून सध्या ती तिच्या करियरमुळे ठाण्यात राहत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Purva Amogh Phadake (@kaushikpurva14)

पूर्वा कोशिक ने तिचे प्राथमिक शिक्षण भगिनी मंडळ हायस्कूल येथून पूर्ण केलं आहे. पूर्वाने आपले महाविद्यालयीन शिक्षण एसेमटीमधून काॅलेजमधून पूर्ण केले. काॅलेजवयात बरेचसे विद्यार्थी सांस्कृतिक विभागाकडे आकर्षित होत असतात. यातूनच काही मंडळी पुढे जाऊन कलेच्या क्षेत्रात आपलं नाव कमावतात. कॉलेज मध्ये असल्यापासूनच कला क्षेत्रात करियर करायचं तिने ठरवलेलं होतं. तिची सुरुवात नाटकांमधून झाली.अनेक एकांकिका, नाटक याच्या स्पर्धा तिने काॅलेजकडून केल्या. ज्यामुळे तिला एक अभिनयाच्या सरावाचा बेस मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Purva Amogh Phadake (@kaushikpurva14)

अभिनेत्री पूर्वा कौशिक हिचं एक ठाम मत आहे की, “जर तुम्हाला कलेच्या क्षेत्रात कार्यरत व्हायचे असेल तर सुरुवातीला तुम्ही नाटकांपासून सुरूवात केली पाहिजे”. असं ती नेहमी सांगत असते. “कानाची घडी तोंडावर बोट” या प्रसाद खांडेकर च्या नाटकातून केलेल्या अभिनयामुळे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली. त्या नंतर तिने “कॉमेडीची बुलेट ट्रेन# नंतर “फुलाला सुगंध मातीचा” या काही सिरियल केल्या. आता “अजूनही बरसात आहे” मध्ये ती उत्तम असे काम करत आहे.

नंतर डोन्ट वरी हो जायेगा हे संजय खापरे यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत केलेलं नाटक आणि तिचा अभिनय ही चांगलाच गाजला. तिचा हा अभिनयाचा प्रवास आता अत्यंत योग्य गतीने जात असल्याचे दिसत आहे. पूर्वा ‘मनस्विनी’ हे पात्र खूपच सुंदररीत्या पार पाडत असून प्रेक्षकांना ती चांगलीच भावते आहे. सध्या तिचा यशाचा काळ सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही.

You might also like