एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रियांका चोप्रा सोबत न्यूयॉर्क मध्ये झाले असे काही कि.. ते फोटो होत आहेत वायरल..

प्रियंका चोप्राच्या हॉलिवूड कारकिर्दीतील ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाच्या अपयशामुळे काही फरक पडला नाही. बेवॉच नंतरही दोन आणखी हॉलीवूड चित्रपट तिला मिळाले आहेत. यातील एक चित्रपट म्हणजे ‘Isn’t it romantic?’ त्यांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहेत.

या चित्रपटाच्या शूटिंगमधून प्रियंका चोप्राची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये प्रियांकाने गुलाबी रंगाचा डीप नेक ड्रेस घातला होता. अभिनेता अ‍ॅडम डिव्हिनसुद्धा तिच्या सोबत दिसला होता, परंतु समोर आलेली छायाचित्रे आश्चर्यचकित करणारी आहेत.

खरं तर त्या चित्रपटात सीन असा आहे की, प्रियांका कॉफी टेबलवर बसून काहीतरी खात आहे. मग त्यातील काही तरी पदार्थ प्रियंका चोप्राच्या गळ्यात अडकतो. त्यानंतर अशा प्रकारे अभिनेता अ‍ॅडम डेव्हिन तिथे पोहोचतो आणि प्रियंकाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रियंका तिचे प्राण वाचविल्याबद्दल अभिनेता अ‍ॅडम डेव्हिन आभार मानते.

हा सीन न्यूयॉर्क मधील एका रेस्टोरंट मध्ये शूट करण्यात आला होता. परंतु या सीनचे छायाचित्र मात्र सर्व इंटरनेट वर वायरल झाले होते.

या चित्रपटात प्रियंकाने योग दूताची भूमिका केली होती. प्रियंका आणि अ‍ॅडम डेव्हिन सोबत या चित्रपटात रिबेल विल्सन आणि लियाम हेम्सवर्थ सारख्या कलाकारांचीही भूमिका होती. चित्रपटाचे दिग्दर्शन स्ट्रॉस शुल्सन यांनी केले आहे तर चित्रपटाची पटकथा एरिन कार्डिलो, डाना फॉक्स, कॅटी सिल्बरमन आणि पॉला पेल यांनी लिहिली आहे.

मित्रांनो आशा आहे की आपल्याला आमचा हा लेख नक्की आवडला असेल. आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like