एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रियांका चोप्राचा पती निक जोनास चा अ’पघात! व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल…

सोशल मीडिया वर सतत काही ना काही गोष्टी व्हायरल होतच असतात. त्या गोष्टी जर सिनेसृष्टीतील लोकांशी निगडीत असतील तर त्या अजूनच व्हायरल होतात. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा चा पती निक जोनास चा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये निक चा अ’पघात झाल्याचे दिसत आहे. प्रियांका आणि निक दोघांचेही चाहते यामुळे चिंतेत आहेत.

डिसेंबर २०१८ मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न झाल्यानंतर दोघेही अमेरीकेतील लॉस अँजेलिस येथील निक जोनास च्या घरी राहायला गेले. प्रियांका चोप्रा कडे अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्स असल्याने ती सध्या तिकडेच असते. या दोघांमध्ये वयाचे अंतर असले तरी या दोघांच्याही चाहत्यांना ही जोडी आवडते. त्यामुळे त्यांचे चाहते नेहमी त्यांच्या पाठीशी असतात.

सध्या निक च्या अ’पघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तो आणि त्याचे दोन्ही भाऊ जो आणि केव्हिन यांनी सायकलच्या शर्यतीत भाग घेतल्याचे दिसते. काही अंतर पार केल्यावर निक ची सायकल चढावर चढताना घसरली आणि तो सायकलवरून पडला. या अ’पघातात त्याच्या बरगडीचे एक हाड मोडले असून त्याच्या माकडहाडाला देखील सूज आल्याचे समजते.

या अ’पघातानंतर प्रियांका आणि निक दोघेही बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स साठी लंडनहून लॉस अँजेलिस ला गेले होते. प्रियांका चोप्राने या अ’पघातानंतर चाहत्यांना उद्देशून एक भावुक मेसेज शेअर केला आहे. यात तिने म्हटले आहे, की ‘चाहत्यांच्या प्रेमापुढे ही दुखापत खूपच किरकोळ आहे. तुम्ही जे करता, त्याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही मला नेहमी प्रेरणा देता. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.’

चाहते निक च्या बरे होण्याची वाट पाहात आहेत. निक ने तो हळूहळू या दुखापतीतून बरा होत असल्याचे सांगितले. निक या दुखापतीतून लवकर बरा होवो आणि त्याची प्रकृती उत्तम रहावी यासाठी त्याचे चाहते त्याला प्रोत्साहन देत आहेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना देखील करत आहेत. चाहत्यांचे प्रेम निक ला या दुखापतीतून लवकर बरे करो, हीच अपेक्षा.

बाकी प्रियांका चोप्रा हॉलिवूड प्रोजेक्ट्स बरोबरच अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मध्येही व्यस्त आहे. तिने नुकतेच राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्याबरोबर ‘द व्हाईट टायगर’ (२०२०) या चित्रपटात काम केले आहे. त्या आधी तिने फरहान अख्तर बरोबर ‘द स्काय इज पिंक’ (२०१९) हा चित्रपट देखील केला होता.

You might also like