एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रियांकाला लागलेत आई व्हायचे वेध! अमेरिकेत या पद्धतीने द्यायचा आहे बाळाला जन्म…

प्रियांका चोप्रा म्हणजे बॉलिवूड चित्रपटांमधील आघाडीचं नाव. मात्र सध्या ती फार कमी बॉलिवूड चित्रपट करताना दिसते. त्याचे कारणही तसेच आहे म्हणा. डिसेंबर २०१८ मध्ये तिने अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनास बरोबर लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती आपल्या पतीबरोबर लॉस अँजेलिस मध्ये रहात आहे. प्रियांका आपले चित्रपट खूप काळजीपूर्वक निवडत असल्याने सध्या ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये थोडी कमी प्रमाणात दिसते. पण तिचे चाहते तिला खूप मिस करतात.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ही चाहत्यांची आवडती जोडी आहे. त्यांच्या लग्नाला आता जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. दरम्यान बऱ्याच वेळा प्रसार माध्यमांमध्ये प्रियांका गरोदर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, पण प्रियांकाने यापैकी कोणत्याही बातमीला दुजोरा दिलेला नाही. २०१९ मध्ये प्रियांका आणि निक च्या निकटवर्तीयांनी त्यांच्या मुलांबद्दल बोलताना सांगितले, की या दोघांवर मुलांबाबत कोणताही दबाव नाही. ते दोघेही व्यवसायिकरीत्या प्रतिबद्ध आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

प्रियांकाने मागे एकदा म्हटले होते, की तिला आई व्हायची खूप इच्छा आहे. पण निक आणि ती दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. येत्या काही दिवसांत आम्ही आमच्यासाठी वेळ काढू. आम्ही आमच्या बाळाचा निर्णय घेणार आहोत. प्रत्येक आई आपल्या बाळासाठी काहीतरी प्लॅन करून ठेवत असते. प्रियांकानेही आपल्या बाळासाठी काही प्लॅनिंग करून ठेवले आहे.

प्रियांका चोप्रा ची इच्छा आहे की तिचे बाळ लॉस अँजेलिस मध्येच जन्माला यावे. सध्या प्रियांका तिथेच रहात असून लॉस अँजेलिस हे तिचे आवडते शहर आहे. प्रियांकाच्या मते तिचे बाळ लॉस अँजेलिस मध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक चांगले राहू शकेल. तिला वाटते की तिच्या बाळाला तिथे जास्त चांगले आणि पोषक वातावरण मिळू शकेल.

प्रियांका जरी बॉलिवूड चित्रपटात कमी दिसत असली तरी तिची बाकी बरीच कामे सुरू आहेत. प्रियांका चोप्रा निर्मिती क्षेत्रात उतरली असल्याने सध्या ती वेग्वेगळ्या चित्रपटांच्या निर्मिती मध्ये व्यस्त आहे. मॅनहॅटन मध्ये तिचे स्वतःचे ‘सोना’ नावाचे रेस्टॉरंट आहे. ‘अनॉमली हेअर केअर’ नावाची तिची हेअर केअर लाईन आहे. एकूणच काय, तर प्रियांका वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त आहे. तिच्या चाहत्यांना मात्र ती कधी नव्या पाहुण्याच्या आगमनाची बातमी देते, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

You might also like