एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सासू पडतेय सुनेवर भारी! प्रियांकाची सासू दिसते तिच्यापेक्षा सुंदर..पहा

स्वतःच्या मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून आज प्रियांका चोप्रा चे नाव घेतले जाते. फिल्म इंडस्ट्री मध्ये कोणीही गॉडफादर नसताना केवळ आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रियांका प्रसिद्धीच्या शिखरावर पोचली आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. आज ती केवळ बॉलिवूड मधील स्टार अभिनेत्री नाहीये, तर हॉलिवूड मध्ये देखील तिने बरेच नाव कमावले आहे.

२००० साली प्रियांकाने ‘मिस वर्ल्ड’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला. लवकरच तिला बॉलिवूड मधून चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. २००३ साली ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ या स्पाय’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. ‘अंदाज’ (२००३) चित्रपटातील तिच्या भूमिकेने तिला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर तिची बॉलिवूड मधील घोडदौड कधीच थांबली नाही.

प्रियांकाने हॉलिवूड मध्ये देखील पदार्पण केले. तिथे देखील आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने तिने नाव कमावले. तिने गायलेल्या इंग्रजी गाण्यांचा अल्बमही बराच गाजला. २०१८ साली तिने हॉलिवूड मधील गायक, गीतकार आणि अभिनेता निक जोनास बरोबर लग्नगाठ बांधली. सध्या ती त्याच्यासोबत न्यूयॉर्क मध्येच राहते. प्रियांकाने हॉलिवूड मध्ये एन्ट्री केली असली तरी तिचे चाहते जगभर आहेत. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेही लोक दिवाणे आहेत.

असे असले तरी तिच्या सौंदर्याची तुलना दुसऱ्या तिसऱ्या कुणाबरोबर नाही, तर चक्क तिच्या सासूबरोबर म्हणजे निक च्या आईबरोबर होते. प्रियांका आणि निक च्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून आपण तिच्या सासूला भेटलोच आहोत. ते फोटो पाहिले असता आपल्या लक्षात येईल की प्रियांकाची सासू म्हणजेच डेनिस मिलर जोनास खूपच सुंदर दिसते. ती प्रियांका पेक्षाही सुंदर असल्याचे अनेक नेटीझन्सचे म्हणणे आहे.

मूळच्या टेक्सस च्या असलेल्या डेनिस यांचे निक चे वडील गायक पॉल केविन जोनास यांच्यासोबत १९८७ साली लग्न झाले. त्यावेळी डेनिस केवळ १९ वर्षांच्या होत्या. २१ व्या वर्षी त्यांनी आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. निक च्या जन्माच्या वेळी ती केवळ २६ वर्षांच्या होत्या. स्टार अभिनेत्रीची सासू देखील तिच्या सौंदर्यामुळे स्टार सासू झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

काय मग मंडळी, कशी वाटली प्रियांकाची सासू? प्रियांकाच्या सासूच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट्स मध्ये आम्हाला जरूर कळवा. तसेच आमचे लेख शेअर करायला विसरू नका.

You might also like