एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री प्रिया बापटच्या बहिणीला पाहिले आहे का? ती देखील आहे चित्रपटसृष्टीशी निगडीत..

सध्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीज च्या दुसऱ्या सिझनची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यामध्ये प्रिया बापट सह अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. प्रिया बापटचा यातला लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

यामध्ये तिने पौर्णिमा गायकवाड हे पात्र साकारले आहे. राजकीय नाट्यावर आधारीत ही वेब सिरीज ३० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण अशा या गुणी अभिनेत्रीची बहीण देखील याच क्षेत्रात कार्यरत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया बापट सोशल मीडिया वर बरीच सक्रीय आहे. तिचे वेगवेगळ्या स्टाईल मधले ग्लॅमरस फोटो ती आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर करत असते. तिच्या स्टाईल स्टेटमेंटने सगळ्या तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या या ग्लॅमरस लूक मागे तिच्या बहिणीचा हात आहे. ती प्रियाची स्टायलिस्ट आहे.

प्रिया बापट ला एक सख्खी बहीण आहे याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. तिची बहीण देखील सिनेइंडस्ट्री मध्येच काम करते. तिच्या बहिणीचे नाव श्वेता बापट आहे. श्वेता बापट सेलिब्रेटी स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta Bapat (@bapatshweta)

प्रियाबरोबरच श्वेता इंडस्ट्री मधील अनेक कलाकारांची स्टायलिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर आहे. यासोबतच प्रिया आणि श्वेताचा ‘सावेंची’ नावाचा साड्यांचा ब्रँड आहे. या ब्रँडचे सोशल मीडिया वर अधिकृत पेज देखील आहे.

या पेजवर साड्यांचे नवनवे कलेक्शन पाहायला मिळते. प्रिया आणि श्वेता बऱ्याचदा या साड्यांचे ब्रँडींग करताना दिसतात. प्रिया आणि श्वेता या बहिणींमध्ये खूपच बॉन्डींग आहे. दोघींच्या एकत्रित फोटोंमधून ते दिसून येते.

प्रियाच्या कामांबद्दल बोलायचं झालं तर प्रिया बापट तिच्या नव्या प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ च्या दुसऱ्या सिझन चा ट्रेलर लाँच झाला आहे. प्रिया आणि उमेश कामत यांची ‘आणि काय हवं’ या गाजलेल्या सिरीज चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रिया ‘पॉंडिचेरी’ या चित्रपटात देखील काम करत आहे. लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे भाऊ किंवा बहीण देखील याच क्षेत्रात काम करत असतात. पण बऱ्याच वेळा प्रेक्षकांना याची कल्पना नसते. त्यासाठीच आम्ही आमच्या लेखांमधून तुमच्यासमोर ही नवनवी माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे आमचे लेख आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like