एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आहे मराठी मधील नावाजलेली अभिनेत्री, नाव ऐकून विश्वास नाही बसणार..

मित्रहो अभिनय क्षेत्रातील अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय असतात, या कलाकारांना पडद्यावर तर आपण पाहतोच तसेच ते सोशल मीडिया द्वारे देखील आपल्या भेटीस येतात. त्यांचे भरपूर सुंदर फोटोज नेहमी चाहत्यांच्या मध्ये शेअर होत असतात त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला खूपशा गोष्टी कळतात.

त्यांच्या आयुष्यातील अनेक रंजक क्षण आपल्याला माहीत होतात आणि त्यामुळे रसिक आणि कलाकार यांच्यात आणखीन घट्ट नाते निर्माण होते. हल्ली सोशल मीडियावर खूपसे कलाकार आपले जुने फोटो शेअर करत आहेत त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावर भरपूर अभिनेत्री सुद्धा सक्रिय असतात, त्यांचे खूपसे सुंदर फोटो शेअर आणि लाईक होत असतात. हल्ली सोशल मीडियावर आणखीन एक अभिनेत्री खूप व्हायरल होत असून तीच्या चिमुकल्या फोटोची भरपूर चर्चा सुरू आहे. सध्या ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसते पण लहान असताना तर ती खूपच निरागस आणि गोड दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

तीचा हा निरागसपणा याआधी कोणाला माहीत नसावा पण तीने जेव्हा सोशल मीडियावर आपल्या बाबांच्या खांद्यावर बिनधास्तपणे विसावलेली या चिमुरडीचा फोटो शेअर केला तेव्हा तीला या फोटोत पाहून अनेकजण थक्क झाले होते तसेच तीचे चाहते खूप खुश झाले होते.

व्हायरल होत असलेली ही छोटीशी परी आणखी कोणी नसून सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट ही आहे. प्रियाने आपला हा लहानपणीचा फोटो पोस्ट करुन खाली ” बाबा आणि मी” अशी कॅप्शन लिहली आहे. या फोटोमुळे तीच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. बालपण कोणाला नाही आवडत, त्या आठवणी खरच खूप महाग असतात.

कारण कितीही किंमत दिली तरीही बालपणाचे दिवस कधीच परत येत नाहीत. ते दिवस फार अनमोल असतात, त्यावेळी घडलेल्या सर्व गमती जमती आयुष्य भर लक्षात राहतात आणि मग त्या आठवणी ताज्या करण्यासाठी या फोटोंचा आपणाला चांगलाच आधार मिळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया बापट ने या फोटोद्वारे बाबांसोबत असलेल्या अनेक आठवणी पुन्हा आठवल्या आहेत. प्रिया एक उत्कृष्ट कलाकार आहे, तीचा अभिनय खूप छान असतो. तीने आजवर ” मी शिवाजीराजे भोसले बोलतोय”, “हॅपी जर्णी”,” वजनदार”,” टाईमपास२”, “टाईम प्लिज” यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले असून तीने साकारलेल्या प्रत्येक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत.

तीने उमेश कामत सोबत लग्न केले आहे. तीचा आणि उमेशचा प्रेमविवाह झाला असून या जोडीने तब्बल ६ वर्षे एकमेकांना डे’ट केल्यानंतर लग्नबेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघे आधीपासूनच चांगले मित्र होते, नंतर त्यांनी आपल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात केले होते.

प्रेमात पडल्यावर मात्र व्यक्त करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा दोघेही गप्प होते अखेर प्रियाने पुढाकार घेतला आणि उमेश समोर आपले प्रेम व्यक्त केले, त्यानंतर मग उमेशने प्रियाच्या वाढदिवसादिवशी तीच्या प्रेमाला होकार दिला होता. उमेश आणि प्रिया हे इंडस्ट्री मधील एक क्यूट कपल आहे, त्यांच्या चाहत्यांना त्यांची जोडी फार आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

या जोडीमध्ये ८ वर्षाचे अंतर आहे पण तरीही हे दोघे एकमेकांना खूप छान पद्धतीने समजून घेतात. त्यांची मैत्री खूप गोड आहे म्हणून तर ते अनेकांना आवडतात. इंडस्ट्री मध्ये या जोडीला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे.

प्रियाने आजवर अनेक चित्रपटात काम केले असून स्वतःची एक विशेष ओळख मिळवली आहे. उमेश ने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे, प्रियाने सोशल मीडियावर बाबांसोबत काढलेला लहानपणीचा फोटो शेअर केला त्यामुळे ती पुन्हा एकदा भरपूर चर्चेत आली आहे.

सध्या ती एका इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम करत असून आदित्य कृपलानी यांच्या कलाकृतीचे नाव ” फादर लाईफ” असे असून लवकरच याचे चित्रीकरण सिंगापूर मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये आपल्याला प्रियाला पाहायला मिळणार आहे, तीचा रेखीव अभिनय पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. प्रिया अशीच पडद्यावर झळकत राहो, नेहमी आपल्या कलेला संधी देत राहो ही सदिच्छा.

प्रिया आणि उमेशला त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्किच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

You might also like