एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘टाइमपास’ चित्रपटामधील ‘दगडू’ पहा, आता दिसतोय असा, त्याचे हॉ’ट लूकिंग फोटो व्हायरल..

“आईबाबा आणि साईबाबा शप्पत… अशीच पायजे आपल्याला!”, “अरे हम गरीब हुए तो क्या हुआ? हम दिल से अमीर है”, “हम जियेंगे अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से… चल ए, हवा आने दे…” या भन्नाट संवादांचा बोलविता धनी म्हणजे दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब.

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास’ या चित्रपटाने धमाल उडवून दिली. यात दगडूची भूमिका करणारा प्रथमेश परब आपल्या विशेष अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

त्या आधी प्रथमेशने ‘बालक पालक’ चित्रटातही सहाय्यक भूमिका निभावली होती. नंतर उर्फी, टाइमपास २, टकाटक, डॉक्टर डॉक्टर, खिचीक, झिपऱ्या, हृदयी वसंत फुलताना यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली.

‘दृश्यम’ आणि ‘खजूर पे अटके’ या हिंदी चित्रपटातही त्याने भूमिका निभावल्या होत्या. प्रथमेशच्या चित्रपटांमधील भूमिका पाहता लक्षात येईल की एक अभिनेता म्हणून तो बराच प्रगल्भ होत गेला आहे.

आपल्या अभिनय कौशल्यांना धार लावताना आपल्या लूक्स कडे देखील प्रथमेशने विशेष लक्ष दिल्याचे दिसते. आधी केवळ अभिनेत्रींची मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात आता अभिनेतेही उत्साहाने भाग घेत आहेत.

आधी केवळ अभिनेत्री आपल्या लूक्स कडे विशेष लक्ष पुरवत असत. आता मात्र काळाची गरज, चाहत्यांची इच्छा आणि वाढलेली स्पर्धा या कारणांमुळे अभिनेतेही आपल्या कपडे, हेअरस्टाईल आणि फिटनेसकडे लक्ष देत आहेत.

साचेबद्ध भूमिकांमध्ये न अडकता प्रथमेशने नेहमीच प्रयोगशीलतेवर भर दिला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले, की “वेगळ्या प्रकारची भूमिका करायचा विचार अनेकदा करत असतो. अशी आव्हानात्मक भूमिका आल्यास ती साकारण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.” प्रथमेशला सचिन तेंडुलकर व्यक्ती म्हणून खूप आवडतो. त्याला एकदा तरी पडद्यावर सचिन साकारायची इच्छा आहे.

आपली अभिनयातली प्रयोगशीलता त्याने आपल्या आयुष्यातही आणली आहे. त्याचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले असता लक्षात येईल की तो नेहमी आपले वेगवेगळ्या स्टाईलमधले फोटो शेअर करत असतो.

त्याचा बदललेला लूक यातून पाहायला मिळतो. आपल्या या नवीन लूक वर त्याने बरीच मेहनत घेतल्याचे दिसून येते. स्टायलिश लूक, हटके हेअरस्टाईल, डॅशिंग बॉडी या सगळ्यामुळे प्रथमेशने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या या बदललेल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे तो तरुणाईचा आवडता कलाकार बनला आहे.

You might also like