एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘हा नक्की प्रभासच आहे का?’ विना मेकअप लूक बघून चाहते हैराण…

कलाकार मंडळी पडद्यावर जशी दिसतात तशीच ती खऱ्या आयुष्यातही दिसतील, याचा काही नेम नाही. पडद्यावर वावरताना त्यांना पूर्ण मेकअप मध्ये वावरावं लागतं. त्यामुळे मेकअप उतरवल्यानंतर ही मंडळी बऱ्याचदा ओळखूच येत नाहीत.

खूप साऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांबरोबर ही गोष्ट होताना दिसते. अशीच काहीशी गोष्ट घडली आहे दाक्षिणात्य अभिनेत्याच्या बाबतीत. हा अभिनेता आहे प्रभास.

प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. प्रभास या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. अभिनेत्री क्रिती सनोन या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार असून अभिनेता सैफ अली खान लंकेशची भूमिका साकारताना दिसेल. याच चित्रपटाच्या गाण्याच्या रिहर्सल साठी प्रभास आणि क्रिती मुंबईमध्ये आले होते. यावेळी प्रभासला बघून बऱ्याच लोकांना ध’क्का बसला.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर क्रिती आणि प्रभास हे दोघे मुंबईत आल्याची बातमी दिली होती. यावेळी त्याने हे दोघे चित्रपटातील गाण्याच्या प्रॅक्टिससाठी एकत्र आल्याचे म्हटले आहे. प्रसार माध्यमांनी या दोघांना गाडीतून उतरताना बघितले आणि लगेच त्यांचे फोटोही घेण्यात आले. हेच फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

या फोटोमध्ये प्रभास ओळखू न येण्याइतका वेगळा दिसतो आहे. त्याचा हा फोटो बघून चाहते हैराण झाले आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत ‘हा नक्की प्रभासच आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे. काहींनी ‘हा स्क्रीनवर खूप वेगळा दिसतो’ अशीही कमेंट केली आहे. एका चाहत्याने ‘बापरे! मी ओळखलेच नाही हा प्रभास आहे ते!’ असे बोलून आश्चर्य व्यक्त केले आहे. एकूणच काय, तर सगळ्यांनाच प्रभासच्या या विना मेकअप लूक ने धक्का बसला आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी जवळपास ३५० ते ४०० कोटी रुपये इतका खर्च करण्यात येत आहे, असं म्हटलं जातं. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट रामायणावर आधारीत असून २०२२ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करणार आहेत. ओम राऊत यांनी ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. मोठा दिग्दर्शक आणि तगडी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून बसले आहेत.

Source:Viral Bhayani

You might also like