एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता…’ मधील कंजूस पोपटलाल आहे खऱ्या आयुष्यात करोडोंचा मालक! इतकी आहे संपत्ती…

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका माहीत नाही असा प्रेक्षक सापडणे कठीणच आहे. एक दशकापेक्षा जास्त ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. यातील सगळीच पात्रे आता प्रेक्षकांच्या घरच्यांसारखी झाली आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे ‘तुफान एक्सप्रेस’ चे धडाडीचे पत्रकार पोपटलाल पांडे. कंजूस आणि लग्नासाठी एका पायावर तयार असलेले पण तरीही कधी मुलगी न मिळणारं असं हे पात्र आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत पत्रकार पोपटलालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे श्याम पाठक. मालिकेत पोपटलालला नेहमीच आपल्या लग्नाची घाई झालेली पाहायला मिळते. मात्र कितीही प्रयत्न केले तरी पोपटलालचे लग्न काही ठरत नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल श्याम पाठक चे लग्न झाले असून त्याला तीन मुलेही आहेत.

२००३ मध्ये श्यामचे लग्न रश्मी बरोबर झाले. १२ जून १९७६ रोजी जन्मलेल्या श्यामला सीए बनायचे होते. त्यासाठी त्याने अभ्यासही सुरू केला होता. मात्र मध्येच त्याला अभिनयाची गोडी लागली आणि आपल्या सीए व्हायच्या स्वप्नाला त्याने रामराम ठोकला.

विशेष म्हणजे श्याम पाठक देखील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ चा विद्यार्थी आहे. त्याने ‘घुंघट’ (१९९७) सारख्या काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यात त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्याने ‘लस्ट, कॉशन’ (२००७) या चिनी चित्रपटामध्येही काम केले आहे. काही जाहिरातींमध्येही श्याम झळकला आहे.

खूप कमी जणांना हे माहीत आहे, की ‘तारक मेहता…’ ही मालिका करण्याआधी देखील श्यामने ‘सुख बाय चान्स’ (२००९), जसुबेन जयंतीलाल जोशी की जॉईंट फॅमिली (२००८) सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र ‘तारक मेहता…’ मधील ‘पोपटलाल’ च्या व्यक्तिरेखेने त्याला प्रचंड नाव, प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला.

मालिकेतील त्याच्या कंजूस व्यक्तिरेखेच्या अगदी उलट त्याचे खरे आयुष्य आहे. तो आता कोट्यवधींचा मालक आहे. आज श्याम पाठक जवळपास १५ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या लक्झरी मर्सिडीज कारची किंमतच जवळपास ५० लाख रुपये आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील त्याच्या भूमिकेसाठी तो प्रत्येक भागाचे ६० हजार रुपये इतके मानधन आकारतो. तर मंडळी, तुम्हाला पोपटलालची भूमिका कशी वाटते, ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका.

You might also like