एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पूजा सावंतचा मराठमोळा लूक होतोय व्हायरल! दागिन्यांनी सजली ही अभिनेत्री…

कपाळावर टिकली, ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि चेहऱ्यावर गोड हसू..पूजाचे हे रूप पाहून कोणीही घायाळ होईल..

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या उत्तम नृत्यासाठी देखील प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या सचित पाटील दिग्दर्शित ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे पूजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याआधी तिने २००८ मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली होती. २०११ मध्ये तिला अंकुश चौधरी बरोबर ‘झकास’ हा चित्रपट करण्याची संधी मिळाली. अनेक मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

अलीकडेच तिने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या मध्ये पूजा मराठमोळ्या लूक मध्ये दिसून आली. गुलाबी रंगाच्या पारंपारिक साडीमध्ये पूजा खूपच उठून दिसत आहे. स्लिव्हलेस ब्लाऊज मुळे या पारंपारिक साडीला एक मॉडर्न लूक मिळाला आहे. या पारंपारिक आणि मॉडर्न लूक साडीच्या फ्युजन मुळे पूजा खूप खुलून दिसत आहे. तिच्या या सुंदर रूपावर साज चढवला आहे तो तिच्या दागिन्यांनी.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

खरंतर हे फोटोशूट एका दागिन्यांच्या ब्रँडसाठी करण्यात आले होते. त्यामुळे पूजाच्या अंगावर या फोटोंमध्ये खूप दागिने दिसत आहेत. अर्थात ते सगळेच तिला शोभून दिसत आहेत. कानात डिझाईनचे झुमके, गळ्यात हार, हातात बांगड्या, बोटांत अंगठी असे दागिने तिला खूप उठून दिसत आहेत. तिने या फोटोशूटसाठी खूप सुंदर पोझ दिल्या आहेत. या सगळ्याच पोझ मध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

कपाळावर बारीकशी टिकली, ओठांवर गुलाबी लिपस्टिक आणि चेहऱ्यावर गोड हसू असे पूजाचे हे रूप पाहून कोणीही घायाळ होईल. तिने आपले हे फोटोत सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत. ‘सुंदर’, ‘खूप सुंदर’ अशा कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी हार्ट इमोजी टाकल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजा आपल्या सुंदर दिसण्याबरोबरच आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपटसृष्टीत तर तिने उत्तमोत्तम चित्रपट केले आहेतच, पण अलीकडेच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ या हिंदी चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल प्रमुख भूमिकेत होता. तिचा नवीन मराठी चित्रपट ‘बळी’ येऊ घातला आहे. यामध्ये ती अभिनेता स्वप्नील जोशी बरोबर दिसणार आहे.

You might also like