एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

म्हणे सैफ ‘बेबो” कडून प्लेनमध्येही ही कामे करवून घेतो, ज्यामुळे करीना सतत होते नाराज!

सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणारी करीना कपूर अशाच एका विषयामुळे चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी करीना आणि तिची मैत्रिण जिममध्ये वर्क आऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोमल नहताचा शो स्टिरी नाईट्स २ येथे करीना तिची मैत्रीण अमृता अरोरासोबत गेली होती.

या शोमध्ये करिनाने तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी बेधडक शेअर केल्या. त्यामध्ये सैफ विषयी तिने अशी काही गोष्ट सांगितली की त्यामुळे करीना नेहमी अस्वस्थ होते. तिला रागही येतो.

या शो मध्ये करीनाने काही मनोरंजक खु’लासे प्रेक्षकांसमोर केले. यावेळी बोलताना ती म्हणाली की, ‘ सैफ च्या एका सवयीमुळे मी अस्वस्थ असते. कधी कधी मला रागही येतो. सैफला कुठे वाटेल तिथे पायाला मालिश करुन घेण्याची सवय आहे. अगदी प्लेनमध्येही तो बिनदिक्कतपणे मला मालिश करायला सांगतो. तो कुठेही झोपतो आणि मला पाय दाबून द्यायला सांगतो.’

आजकाल १०४८ एफ एम वर असणाऱ्या ‘वाॅट वूमन वांट’ या शोमध्ये करिश्मा कपूर, मलायका अरोरा,, स्वरा भास्कर, अमृता अरोरा या अभिनेत्री येत असतात. करीनाही या शोमधून एका वेगळ्या मुद्दयाने चर्चेत आली होती.

इथेही तिने तिच्या आयुष्यातील काही किस्से रसिकांना ऐकवले. एका आवडीमुळे म्हणे सैफला वेड लागले होते आणि त्याला कुठेच बाहेर जाण्याची इच्छाही होत न्हवती. नेमकी ही आवड काय होती? आणि सैफला बाहेर जाणे का बरं नको वाटत होते?

तैमुर च्या जन्मानंतर सैफला तैमुरचे इतके वेड लागले होते की त्याला सोडुन तो कुठेही बाहेर जात नसे. सतत तैमुरसोबत राहण्याची इच्छा तो व्यक्त करत असे. करीना सांगते, ‘ सैफ वेड्यासारखा करायचा. अगदी शुटवरही जायचा नाही. शुट कॅन्सल करायला सांगायचा. अखेर मीच त्याला ढकलून शुटसाठी बाहेर पाठवत असे.’

‘ तैमूरशिवाय मी कुठेही जाणार नाही. मग मी म्हणायचे की तुला जाऊन काम करायला हवं.’ याशिवाय ट्रो’लर्स जेव्हा तिला बेफिकीर आई म्हणतात तेव्हा तिच्या मनात काय चालले आहे हे करीनाने सांगितले. लोक अनेकदा करीना कपूरला ‘बेफिकीर आई’ असे संबोधून ट्रो’ल करतात.

अशा परिस्थितीत करिनाने आपल्या टॉक शो दरम्यान त्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे. करीना म्हणाली, “तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही. अशा परिस्थितीत, हे लक्षात ठेवा की यावेळी मी तुम्हाला बोट दाखवित आहे जे बहुतेक वेळा माझ्या मनात असते.”

You might also like