एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझा होशील ना’, मधील पिंट्या मामांची बायको आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री, अक्षय कुमार सोबत केले या चित्रपटात काम..

मित्रहो बॉलिवूड प्रमाणे मराठी इंडस्ट्रीत सुद्धा कोणाचे कुणासोबत नाते निघेल याला काही मेळ नसतो कोण्ही कोणाचा मुलगा असतो तर कोण्ही कुणाची मुलगी, वडील अभिनेता असतो तर मुलगा डायरेक्टर याला ताळमेळ नसतो पण ही इंडस्ट्री आहे जी सर्वाना थक्क करून सोडते त्यावरून या गोष्टी अगदी सामान्य आहेत. मराठी मालिका क्षेत्रात बायको आणि नवरा मिळून एकत्र काम करताना तुम्हाला सध्या दिसत असेल.

नवरा बायको काम करणारे अशी खूप सारी उदाहरणे आहेत अश्या बाबतीत सुप्रसिद्ध अभिनेते उमेश कामत आणि प्रिया बापट यांचे उदाहरण घेता येईल. जे आपल्या नाजूक स्वीट लव्हस्टोरी ‘आणि काय हवं ?’ यासाठी ओळखले जातात. या भन्नाट वेबसेरीजसाठी ते खूपच प्रसिद्ध आहेत त्या वेबसरीजचा आत्ता पुढील देखील सिजन प्रेक्षकांनच्या भेटीस आला आहे त्यावर प्रेक्षक खूप सार प्रेम देत आहेत.

त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर त्यांनी खूप साऱ्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे त्यांनी एका हिंदी मालिकेत सुद्धा एकत्र काम केलं आहे त्यांची ‘तू तोता मैं मैना’, ही विशेष चाललेली मालिका आहे.

याचबरोबर अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी देखील एकत्र काम केलं आहे, ‘माझा होशील ना’ या मालिकेतील गौतमी देशपांडे आणि त्यांची बहीण मृण्मयी देशपांडे या देखील एकत्र काम करत असतात. माझा होशील ना ही मालिका विशेष प्रेक्षकांना आवडली आहे. याच मालिकेत पिंट्या मामाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते आहे.

पिंट्या मामाची भूमिका साकारणारे अभिनेते निखील रत्नपारखी यांना तुम्ही या आधी मालिकेत चित्रपटात पाहिलं असेल त्यांची विनोदशैली प्रेक्षकांना खूप आवडतं असते. पण आज आम्ही निखिल रत्नपारखी यांच्या पत्नी विषयी बोलणार आहोत. निखिल रत्नपारखी यांच्या पत्नीचे नाव भक्ती रत्नपारखी असे आहे.

त्या देखील एक अभिनेत्री आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी बंद पडलेली मालिका ‘अगं बाई सासू बाई’, या मालिकेत त्या मॅडीचे पात्र निभावत होत्या. याचबरोबर निखिल रत्नपारखी यांच्या पत्नीने परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी फिल्म ‘ओ माय गॉड’, मध्ये देखील काम केले आहे. तर तुम्हाला ही जोडी कशी वाटली कमेंट्स मध्ये कळवा.

You might also like