एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फोटो मधील लहान मुलगी आज आहे मराठी चित्रपट सृष्टी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री..नाव जाणून आश्चर्य वाटेल

कलाकार बर्‍याचदा आपल्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियावरून सर्वांन पर्यंत पोहचवत असतात. अशा वेळी कलाकार आपल्या काही बालपणातील छायाचित्रे शेअर करत असतात. जेव्हा आपण कलाकारांची ही बालपणातील चित्रे पाहतो तेव्हा आपण बहुतेकदा आश्चर्य करतो आणि विचारात पडतो.

कलाकार त्यांच्या आठवणी, त्यांचे अनमोल क्षण सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह सामायिक करतात. गेल्या अनेक दिवसांपासून एका लहान मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल होत आहे. ही मुलगी इतर कोणी नाही तर प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आहे. अमृता सुभाषने तिच्या बालपणाचा एक फोटो आपल्या आई सोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

अमृता प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अमृताने ‘आई ‘ असे लिहले आहे. अमृताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांशी संपर्कात असते.

चाहते नेहमी तिच्या फोटोंवर आणि व्हिडिओंवर कंमेंटचा वर्षाव करतात. ती तिच्या खासगी प्रकल्पांविषयीची सर्व माहिती तिच्या चाहत्यांसोबतही शेअर करते.

अमृताचे शिक्षण दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे झाले आहे. हिंदी आणि मराठी दोन्ही क्षेत्रा मध्ये तिने नाटके केली आहेत. या मध्ये ‘ती फुलरानी’ नाटक खूपच प्रसिद्ध आहे. तिने २००४ मध्ये श्वास या मराठी चित्रपटातून डेब्यू केला आणि ती एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

२०१२ मध्ये तिने ‘सा रे गा मा पा’ या मराठी रियलिटी शोच्या सेलिब्रिटीमध्ये भाग घेतला होता. अमृता सुभाष एक उत्कृष्ट लेखक असून तिचे ‘एक उलट एक सुलत’ हे पुस्तक २०१४ मध्ये प्रकाशित झाले होते. अमृता हिने हिंदी चित्रपटांतही चांगली कामगिरी केली आहे.

अमृता सुभाषने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम केले आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडची सर्वात मोठी हिट फिल्म ‘गली बॉय’ मधील तिच्या व्यक्तिरेखेवरही प्रेक्षकांचे बरेच लक्ष लागले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like