एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

व्हॉ’ट्स’ऍप हॅ’क करणारे हे ‘पेगॅसस स्पायवेअर’ नक्की आहे तरी काय? कसे काम करते हे स्पायवेअर?

टेक्नॉलॉजी विश्व म्हटलं की त्यात काही ना काही तरी नवीन घडतच असतं. आता इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचंच बघा. २०१९ नंतर आता पुन्हा हे स्पायवेअर चर्चेत आलं आहे. २००८ मध्ये स्थापन झालेल्या इस्रायलच्या एनएसओ ग्रुप या सायबरआर्म फर्म ने तयार केलेले पेगॅसस स्पायवेअर जवळपास दहा देशांच्या सरकारांनी वापरले आहे आणि त्याद्वारे त्यांनी आपल्याच देशात हेरगिरी केली असल्याचा आरोप ऍम्नेस्टी इंटरनॅशनल ने केला आहे. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली पेगॅसस स्पायवेअर द्वारे काही भारतीय पत्रकार आणि सामाजिक संस्थांची गोपनीय माहिती हॅ’क होत असल्याचा मेसेज व्हॉ’ट्स’ऍप ने केला होता. हे स्पायवेअर मुख्यतः अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोन मध्ये काम करतं. या स्पायवेअरद्वारे होणारी हेरगिरी लक्षातही येत नाही इतक्या बेमालूमपणे हे स्पायवेअर काम करतं.

हे स्पायवेअर शक्यतो जगभरातील अधिकृत सरकारी यंत्रणांना विकलं जातं. दह’श’तवादाला आळा बसावा हा त्यामागचा उद्देश. त्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचतील या आशेने हे स्पायवेअर निर्माण करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. मात्र अनेक सरकारी यंत्रणांनी याचा वापर आपल्याच देशातील पत्रकार आणि विरोधी विचारांच्या सामाजिक संस्थांवर नजर ठेवण्यासाठी केला असल्याचे उघड झाले आहे.

‘पेगॅसस’ म्हणजे काय?
‘पेगॅसस’ हा एका पौराणिक कथेतील पंख असणारा घोडा आहे. हा एक ट्रोजन हॉर्स असून हवेद्वारे फोन्स ना हॅ’क करणे हा त्याचा उद्देश आहे.

कसे काम करते पेगॅसस स्पायवेअर?
पेगॅसस स्पायवेअर या प्रोग्रामने एखाद्या स्मार्टफोन मध्ये प्रवेश केला तर त्या स्मार्टफोन चा मायक्रोफोन, कॅमेरा, ऑडिओ, इ-मेल, टेक्स्ट मेसेज आणि लोकेशन अशी कोणतीही माहिती तो हॅ’क करू शकतो. व्हॉ’ट्स’ऍपचे एनक्रिप्टेड मेसेज आणि ऑडिओ देखील या स्पायवेअरच्या माध्यमातून हॅ’क आणि डीकोड करता येतात. एनक्रिप्टेड मेसेजची माहिती ही केवळ पाठवणारा आणि वाचणारा अशा व्यक्तींनाच असते. ज्या प्लॅटफॉर्म वरून हे मेसेज पाठवले जातात त्यांना देखील ते मेसेज वाचता येत नाहीत.

हे स्पायवेअर तुमच्या फोन मध्ये कसे येते?
हे स्पायवेअर एखाद्याच्या फोनमध्ये टाकायचे असल्यास त्याला केवळ एक व्हॉ’ट्स’ऍ’प कॉल करावा लागतो. समोरच्या व्यक्तीने तो कॉल नाही उचलला तरी हे स्पायवेअर त्याच्या फोनमध्ये प्रवेश करते आणि गोपनीय माहिती हॅ’क करते.

You might also like