एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुंबई इंडियन्स या खेळांडूवरती कोसळला दुःखाचा डोंगर! दीर्घ आजाराने झाले वडिलांचे नि’धन..

भारतीय क्रिकेट संघातील माजी विकेट-कीपर आणि फलंदाज पार्थिव पटेल याच्या वडिलांचे दीर्घ आजाराने आज रविवार (२६ सप्टेंबर) रोजी नि’ध’न झाले. पार्थिवने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वरून ही दुःखद वार्ता दिली आहे. पार्थिवच्या वडिलांचे नाव अजयभाई बिपीनचंद्र पटेल होते.

३६ वर्षीय या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. २५ कसोटी आणि ३८ एकदिवसीय सामने खेळलेल्या या खेळाडूच्या वडिलांच्या नि’धनाची बातमी ऐकताच क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. अनेक नामांकित लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपल्या पोस्ट मध्ये पार्थिवने लिहिले आहे, की “हे कळवताना अत्यंत दुःख होत आहे की माझे वडील श्री. अजयभाई बिपीनचंद्र पटेल यांचे नि’धन झाले आहे. २६ सप्टेंबर २०२१ रोजी ते आपल्या शेवटच्या प्रवासाला निघून गेले. ते पाठीमागे आमच्यासाठी सुखद आठवणी ठेवून गेले आहेत ज्या आमच्या नेहमी स्मरणात राहतील. माझ्या प्रिय वडिलांच्या नि’धनामुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत. तुम्ही त्यांना तुमच्या स्मरणात ठेवाल, अशी आम्ही आशा करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

२०१९ पासून पार्थिवचे वडील ब्रेन हॅमरेजशी झुंज देत होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी म्हणजे अहमदाबादला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. या आजाराशी लढा देत अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. २०१९ मध्ये पार्थिव आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातून खेळत होता. भारतीय संघासोबत कसोटी खेळणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता. वयाच्या १७ व्या वर्षीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला आपले संघातले स्थान फार काळ टिकवता आले नाही.

आयपीएल मधून त्याने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्याला आयपीलच्या विविध संघांबरोबर खेळायची संधी मिळाली. चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, कोची टस्कर्स, सनरायझर्स हैद्राबाद, मुंबई इंडियन्स या संघांबरोबर खेळत त्याने आयपीएल मध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या तो मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून टॅलेंट स्काउटचे काम पहात आहे.

पार्थिवने दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यांमध्ये ९३४ धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ७३६ धावा आहेत. गेल्या वर्षी मात्र त्याने क्रिकेट मधून संन्यास घेतला. आपली सेकंड इनिंग त्याने समालोचक म्हणून सुरू केली आहे. सध्या तो आयपीएल २०२१ साठी समालोचक म्हणून काम पाहत आहे.

You might also like