एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सैराट’ मधील परश्या मध्ये झाला आहे आता खूपच बदल, दिसतो असा..पहा

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. या चित्रपटाने अनेक नवे चेहरे चित्रपटसृष्टीला दिले. यातील आर्ची आणि परश्या ची भूमिका करणारे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झाले. दोघांनीही आपल्या अभिनयाने आपली पात्रता सिद्ध केली. पुढे दोघांनी हिंदी मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. आपल्या क्षमतेमुळं दोघांनी या क्षेत्रातही नाव कमावले.

परश्या म्हणूनच प्रसिद्ध झालेला आकाश ठोसर तरुणींचा लाडका आहे. आकाशचा जन्म २४ फेब्रुवारी १९९४ रोजी झाला. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या जेऊर गावचा आहे. पैलवानकी करणाऱ्या आकाशला नागराज मंजुळे यांचे भाऊ भारत मंजुळे यांनी पाहिले आणि ‘सैराट’ चित्रपटासाठी ऑडिशन देण्याबद्दल सुचवले. पुढे त्याचे सिलेक्शन झाले आणि त्यानंतर ते झाले, ते तर सगळ्यांना माहीतच आहे.

View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

‘सैराट’ नंतर आकाशने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू: फ्रेंडशिप अनलिमिटेड’ (२०१७) या चित्रपटात काम केले. पण हा चित्रपट फारसे यश मिळवू शकला नाही. त्यानंतर त्याला नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ (२०१८) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यात त्याने अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेल्या भागात काम केले आहे. त्याच्याबरोबर अभिनेत्री राधिका आपटे देखील या चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. या वर्षी त्याने डिस्ने हॉटस्टार वरील महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘१९६२: द वॉर इन द हिल्स’ या वेब सिरीज मध्ये काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातही त्याने काम केले आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर रिंकू राजगुरू देखील असणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील काम केले आहे. मात्र हा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाहीये. आकाशच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. आकाशचा आजपर्यंतचा प्रवास पाहून प्रेक्षकांना नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

सोशल मीडिया वर आकाश खूप सक्रीय आहे. अलीकडेच त्याने आपले काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्याच्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडत आहे. त्याने आपले शरीर कमावण्यावर बरीच मेहनत घेतलेली दिसून येते. अर्थातच त्याचा हा लूक बघून तरुणी घायाळ झाल्या आहेत. त्याच्या बऱ्याच चाहत्यांनी त्याच्या या फोटोंवर कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.

काय मग मंडळी, तुम्हाला कसे वाटले आकाशचे हे फोटो? आम्हाला कमेंट्स महदये नक्की सांगा. तसेच आमचे लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like