एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पार्क केलेली गाडी उतारावरून दरीत; थरार कॅमेऱ्यात कैद

कधी कधी काही घटना अचानक घडतात. काही लक्षात येण्यापूर्वी किंवा त्यावर काही करण्यापूर्वीच त्या घडून जातात. या घटना घडून गेल्यानंतर त्यामुळे झालेले नुकसान लक्षात येते. काही गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नाही, याचाच हा पुरावा. चीनमध्ये अशी एक घटना घडली आहे जी बघून अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. निसर्गसौंदर्याचा आस्वाद लुटण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असे त्या कुटुंबाला स्वप्नातही वाटले नसेल!

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ च्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत जवळपास साडेबारा लाख पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओ मध्ये एक कुटुंब कारमध्ये बसलेलं असताना कर हळूहळू सरकत दरीत पडली हे बघता येते.

काय घडलं त्या कड्यावर?
डेली मेलच्या वृत्तानुसार, चीनमधील झिनजियांगच्या डुकू मार्गावर एका कुटुंबाने आपली कार उभी केली होती. समोरच्या सुंदर निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी ते एका कड्यावर थांबले होते. कार या उंच कड्याच्या अगदी टोकालाच उभी करण्यात आली होती. कार ज्या ठिकाणी उभी होती ते एक पर्यटनस्थळ आहे. त्या कड्यापासून खाली एक खोल दरी जाते.

Source:South china morning post

व्हिडिओ मध्ये दिसत आहे की ड्रायव्हर काही तरी पिण्यासाठी कारबाहेर उतरला आहे. कारमध्ये अजून तीन व्यक्ती आहेत. ड्रायव्हर उतरून थोडासा बाजूला होताच कार हळूहळू पुढे सरकू लागली. ड्रायव्हरने ते बघताच कारकडे धाव घेतली. घाबरून त्याने कार मागे ओढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या वेळात मागच्या सीटवर बसलेला एक तरुण मुलगा पटकन गाडीतून उतरला. त्याचबरोबर मागच्या सीटवर बसलेल्या एक वृद्ध महिलेलाही गाडीतून उतारण्यात यश आले.

तो मुलगा आणि वृद्ध महिला गाडीपासून लांब झाले. मात्र पॅसेंजर सीटवर बसलेल्या महिलेला मात्र गाडीतून उतरता आले नाही. तिला आपला सीटबेल्ट काढता न आल्याने तिला गाडीतून उतरता आले नाही, असे ‘द सन’ ने म्हटले आहे. शेवटी गाडी सरकत सरकत थेट समोरच्या दरीत कोसळली. त्या महिलेच्या जीवाला काही धो’का राहिलेला नसला तरी तिच्या मनगटाला जबरदस्त लागले आहे.

ही घटना का घडली याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. बऱ्याच जणांचे म्हणणे पडले की गाडीचा हॅण्डब्रेक लावण्यात आला नव्हता त्यामुळे गाडी उतारावरून खाली सरकली. त्याचे नक्की कारण अद्याप समोर आलेले नाही. हा सर्व थरार एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

Source:South china morning post

You might also like