एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करोडपती असूनही अत्यंत साधे आयुष्य जगतो हा अभिनेता! जाणून घ्या या अभिनेत्याचा जीवन प्रवास…

काही माणसे कितीही मोठ्या पदावर गेली, कितीही पैसा कमावला, कितीही प्रसिद्धी मिळवली तरी आपला साधेपणा सोडत नाहीत. अशीच माणसे आयुष्यात खूप पुढे जातात. बॉलिवूड इंडस्ट्री खूप श्रीमंत इंडस्ट्री समजली जाते. येथील कलाकार खूप पैसे मिळवतात आणि त्यामुळे त्यांचे राहणीमानही तसेच उच्च दर्जाचे असते. मात्र काही कलाकार मात्र याला अपवाद असतात. कितीही यश मिळवलं तरी यांच्यातला साधेपणा तसूभरही कमी होत नाही.

असाच एक कलाकार आहे पंकज त्रिपाठी. काही वर्षांपूर्वी पर्यंत हे नाव कोणाला फारसे माहीत नव्हते. आता मात्र अगदी लहान लहान मुले सुद्धा या अभिनेत्याला ओळखू लागली आहेत. ५ सप्टेंबर १९७६ रोजी बिहारच्या गोपालगंज या गावात या हरहुन्नरी कलाकाराचा जन्म झाला. पहिल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती.

Third party image reference

अभिनेता होणं हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पंकज यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यात त्यांच्या पत्नीने मृदुलाने त्यांना खूप मोलाची साथ दिली आहे. पंकज जेव्हा आपल्या स्वप्नाच्या मागे धावत होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने घर सांभाळले आहे. त्यांची पत्नी नोकरी करत असे. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर कसेबसे घर चालत असे.

Third party image reference

परिस्थितीला शरण जाऊन आपल्या स्वप्नांना कोमेजू देणं पंकज त्रिपाठींना मान्य नव्हतं. त्यामुळे आपले अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एनएसडी मधून अभिनयाचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यानंतर ते मुंबईला आले. मात्र इथे ते कोणालाच ओळखत नव्हते. या नव्या शहरात त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ना डोक्यावर छप्प्पर होते, ना खिशात दमडी. मात्र त्यांनी धीर आणि प्रयत्न सोडला नाही. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले.

हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे सुरू झाले आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यांनी आजपर्यंत ६० पेक्षा जास्त चित्रपट आणि ६० पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे. गँग्स ऑफ वासेपूर, बरेली की बर्फी, फुकरे, निल बटे सन्नाटा, न्यूटन ही त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

ते ज्या चित्रपटात काम करतात, त्या मनोरंजन हे हमखास ठरलेले असते. कधीकाळी हलाखीत दिवस काढणाऱ्या पंकज त्रिपाठींनी आपले स्वप्न पूर्ण केले आणि आता त्यांनी मुंबईत एक बंगला विकत घेतला आहे. तेथे आता ते आपल्या कुटुंबाबरोबर राहतात.

You might also like