एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पंड्या बंधूंनी मुंबईच्या या भागात खरेदी केले नवीन घर, किंमत जाणून थक्क व्हाल..

कधी 'मॅगी' वर पोट भरणाऱ्या पंड्या बंधूंची कमाल! मुंबई मध्ये खरेदी केला तब्ब्ल इतक्या कोटीचे घर..

रंकाचा राव होणे म्हणजे काय हे एका क्रिकेटपटू द्वयीने दाखवून दिले आहे. ही कमाल केली आहे पंड्या बंधूंनी. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू. कष्टातून वर येत या बंधूंनी आज क्रिकेट जगतात आपली ओळख निर्माण केली आहे. आयुष्यात या दोघांनी अनेक आर्थिक अडचणींचा सामना केला आहे. प्रसंगी बॅट उधार घेत हे दोघे क्रिकेटचा सराव करायचे.

आज हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या ही भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या दर्जेदार कामगिरीने या दोघांनी भारतीय संघात आपले स्थान अढळ ठेवले आहे.

टीम इंडिया मधील प्रवेश आणि आयपीएल मधील उत्कृष्ट कामगिरी यामुळे त्यांनी क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. एकेकाळी केवळ मॅगी खाऊन जगणारी ही भावांची जोडी आज मात्र ऐषोआरामाचे आयुष्य जगत आहेत. या दोघांनी नुकताच मुंबई मध्ये एक फ्लॅट घेतला आहे.

त्यांच्या या आलिशान फ्लॅटची किंमत जवळपास ३० कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. हा फ्लॅट ८ बीएचके असल्याचे बोलले जात आहे. मुंबई मधील रुस्तमजी पॅरामाऊंट येथे पंड्या बंधूंचा हा फ्लॅट असल्याचे कळते.

हार्दिक आणि कृणाल यांच्या या फ्लॅट मध्ये जिम आणि गेमिंग झोन आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या या फ्लॅट मध्ये खाजगी जलतरण तलाव आणि थिएटर देखील आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे देखील याच सोसायटीमध्ये राहतात.

एकेकाळी प्रति सामना ४०० ते ५०० रुपये कमावणारे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आज एवढी प्रगती करत आहेत हे पाहून त्यांच्या चाहत्यांना त्यांचा अभिमान वाटतो.

अलीकडेच हे दोघे भारतीय संघाबरोबर श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले होते. टी-२० मालिकेसाठी हा दौरा होता. मात्र दोघानांही या मालिकेत लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. कृणाल पंड्याने दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये एक विकेट आणि ३५ धावांचे योगदान दिले. हार्दिक पंड्याला मात्र १९ धावांवर समाधान मानावे लागले. दरम्यान कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या मालिकेतला दुसरा सामना काही काळ स्थगित करण्यात आला होता. कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना देखील मालिकेतून बाहेर पडावे लागले. मात्र याचा विपरीत परिणाम भारतीय संघावर झाला. श्रीलंकेने याचा फायदा घेत भारतावर २-१ असा विजय मिळवला.

You might also like