एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

“पंढरीची वारी” चित्रपटांत ‘विठोबा’ साकारणारा छोटा कलाकार आठवतो का? शिक्षण सोडून…

केवळ महाराष्ट्रभरच नाही तर जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे सर्वच ठिकाणी आषाढी वारीचा एक वेगळाच आनंदअसतो. दरवर्षी पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे लाखोंच्या संख्येने वारकरी आपल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

गेली दोन वर्षे को’रोनाच्या संकटामुळे वारकऱ्यांच्या उपस्थितीत वारी होऊ शकली नाही. पण तरीही वारीचा आनंद तिळमात्र कमी झालेला न्हवता. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या सोहळ्याला महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. अनेक भक्ति सोहळ्यांपैकी पंढरीच वारी हा एक अभूतपूर्व सोहळा आहे.

याच पंढरीच्या वारीवर १९८८ साली “वारी पंढरीची” हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात असलेली पंढरीची वारी जयाची कुळी…,धरिला पंढरीचा चोर…कांदा, मुळा भाजी अवघी विठाई ही गाणी आजही तितकीच सुपरहिट आहेत.

त्यावेळी या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सगळ्या थिएटर बाहेर हाऊसफुल्ल चे बोर्ड लागले होते. तिथून पुढे जेव्हा केव्हा वारी असेल तेव्हा टी. व्ही. चॅनेलवरती हा सिनेमा हमखास दाखवला जातो. आजही हा सिनेमा लोक तितकाच आनंद घेऊन पाहताना बघायला मिळतात.

जयश्री गडकर, बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ (विरोधी भूमिका) अशा अनेक नामवंत कलाकारांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

याच चित्रपटात ‘विठ्ठलाचे रूप’ म्हणून अभिनय केलेल्या लहान मुलाने चांगलीच कमाल केली होती. चित्रपटातील कुटुंबाला पंढरीची वारी करताना वाटेत हा लहानगा भेटतो आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून त्या कुटुंबाचं रक्षण करतो. शेवटी हाच मुलगा विठ्ठलाचेच एक रूप असल्याचे दाखवण्यात आले आहे. मुकी भूमिका असल्याने एकही डायलाॅग नसताना देखील हावभावाच्या जोरावर या कलाकाराने प्रचंड भारी काम करून दाखवलं होतं.

“पंढरीची वारी” या चित्रपटाचे दिवंगत दिग्दर्शक आणि संवाद लेखक रमाकांत कवठेकर यांचा सुपुत्र बकुल कवठेकर याने ती भूमिका साकारली होती. आण्णासाहेब घाटगे हे या चित्रपटाचे निर्माते होते. साक्षात विठोबाचे रूप साकारणारा हा बालकलाकार शेवटी साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू आणतो.

काभिनय करून केवळ हावभावाद्वारे अभिनय साकारणे हे खरं तर मोठे आव्हानाचे काम परंतु त्याने ते अतिशय उत्तमरीत्या साकारलेले पाहायला मिळाले होते. हा बकुल कवठेकर पुढे जाऊन त्याने नेमके केले तरी काय? याबद्दल आधिक जाणून घेऊयात.

याच चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा मुलगा असलेल्या बकुलने पुढे मात्र चित्रपटांमध्ये काम केल्याचे दिसून आले नाही. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून बकुलने पुण्याच्या भारती विद्यापीठातून फाईन आर्ट्स चे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पण खेदाची बाब अशी की त्याचे शिक्षण सुरू असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. २००२ मध्ये या कलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन झाले.

पुढे जाऊन एक उत्तम कलाकार होत असणाऱ्या या कलाकाराला काळाने अडवले. याचे दुःख तुम्हा आम्हाला कायम राहिल. पण नंतर बकुलचा भाउ समीर कवठेकर याने मात्र या क्षेत्रात आपले चांगले करियर केले.

समीर कवठेकर यांनी “बकुल फिल्म्स” नावाने स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी”, ” स्वराज्यजननी जिजामाता”, राजा शिवछत्रपती” या मालिका तसेच “अजिंठा”, “बालगंधर्व” या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली आहे.

खाकी, मंगल पांडे या बॉलिवूड चित्रपटासाठीही त्यांनी काम केले आहे. “बकुल कवठेकर” ह्या बालकलाकाराने ह्या चित्रपटात जे उत्कृष्ट काम केले आहे ते आजही पाहताना पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणत, ह्या बाल कलाकाराला आमच्या कडून मानाचा मुजरा…मराठी रंगभूमी आपला अभिनय कायम स्मरणात ठेवील.

You might also like