एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लग्न करून मी माझा बदला घेतला’ पद्मिनी कोल्हापुरेंचा त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अजब खु’लासा

१९७४ मध्ये ‘एक खिलाडी बावन पत्ते’ या चित्रपटातून अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केले तेव्हा त्या जेमतेम ९-१० वर्षांच्या होत्या. अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. आपल्या सुंदर अभिनयाने या अभिनेत्रीने सिनेरसिकांची मने जिंकून घेतली आहेत.

हल्ली त्यांचा चित्रपटातील वावर काहीसा कमी झालेला असला तरी प्रेक्षक अजूनही त्यांना विसरलेले नाहीत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये त्या कपिल शर्मा च्या शो मध्ये दिसत आहेत. त्यांना विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी खूप उत्साहाने आणि उस्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे दिसते. बऱ्याच गप्पांमध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनावरही बोलणे झाले. यातून त्यांनी केलेला खुलासा अजबच आहे, असे म्हणावे लागेल.

या शो मध्ये कपिल शर्माने पद्मिनी यांना एका अ’फ’वेचे स्पष्टीकरण देण्याबाबत सुचवले. कपिल म्हणाला, की आम्ही अशी अ’फ’वा ऐकली आहे की टूटू शर्माने तुम्हाला पेमेंट दिले नव्हते म्हणून रागाने तुम्ही त्यांच्याशी लग्न केले. कपिल शर्माच्या या प्रश्नाला त्यांनी जबरदस्त उत्तर देत कपिल शर्मा, अर्चना पुरणसिंग आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आणि हशा दोन्ही मिळवले.

१९८६ मध्ये पद्मिनी यांची भेट प्रदीप उर्फ टूटू शर्मा या निर्मात्याशी झाली. त्यावेळी त्या ‘ऐसा प्यार कहा’ चित्रपटाचे शूटींग करत होत्या, तर टूटू शर्मा या चित्रपटाचे निर्माते म्हणून काम बघत होते. आपल्या पतीविषयी कपिल शर्माच्या शो मध्ये कपिलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी लग्न करून माझा बदल घेतला आणि अजूनही तो सुरूच आहे. यावर कपिल आणि अर्चनाला आपले हसू आवरता आले नाही.

झाले असे, की कपिलने जेव्हा पद्मिनी कोल्हापुरेंना अ’फ’वेबद्दलचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी “अगदी बरोबर आहे. मी विचार केला की त्यांच्यासोबत लग्न करू” असे हसत हसत उत्तर दिले. त्यावर अर्चना पुरणसिंगने “लग्न करून ब’द’ला घेतला तर…” अशी मिश्किल कमेंट केली. त्यावर हसून पद्मिनी यांनीदेखील त्या गोष्टीला दुजोरा दिला.

या शो मध्ये पद्मिनी यांनी त्यांना गायिका व्हायचे होते, असेही सांगितले. मात्र त्यांच्या आजीची इच्छा असल्याने त्यांना अभिनेत्री बनावे लागले. त्यांच्या करिअर मधल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी या शो मध्ये शेअर केल्या. तुम्हाला माहीत आहे का, की पद्मिनी आणि प्रदीप यांना प्रियांक नावाचा मुलगा आहे?

You might also like