एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ओ शेट…’ नंतर आता ‘ओ सर…’ व्हायरल! पहा लहान मुलाचा व्हिडिओ…

मध्यंतरीच्या काळात ‘ओ शेट…’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. त्यावर अनेक जणांनी आपले डान्स व्हिडिओ करून सोशल मीडिया वर अपलोड देखील केले. ‘ओ शेट, तुम्ही नादच केलाय थेट… ओ शेट, तुम्ही मानूस हाय लई ग्रेट’ असे या गाण्याचे बोल फारच प्रसिद्ध झाले. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच या गाण्याचे वेड लागले होते. लग्न असो वा मिरवणूक असो, सगळीकडे हेच गाणं वाजत होतं.

आता त्याच गाण्याच्या अनुषंगाने दुसरं गाणं जन्माला आलं आहे. ‘ओ शेट…’ च्या चालीवरच ‘ओ सर…’ हे गाणं सध्या फार गाजतंय. एका लहान मुलाने हे गाणं म्हटलं आहे. को’रोना काळात सगळ्याच शाळा बंद झाल्यामुळे शिक्षण मंडळाने शाळा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीड वर्षांपेक्षा जास्त मुले घरात बसून स्क्रीन वर शाळा शिकत आहेत.

ना मित्रांना भेटणं, ना शिक्षकांचा ओरडा खाणं! सगळंच ऑनलाईन असलं तरी मित्रमंडळी, शाळेतली धमाल, शिक्षकांचा ओरडा, शाळेच्या मैदानावर खेळणं या गोष्टी सगळ्याच मुलांनी मिस केल्या आहेत. मुलांच्या याच भावना या गाण्यातून मांडण्यात आल्या आहेत.

को’रोना काळात मुले जरी आपल्या मित्रांच्या संपर्कात रहात असली, तरी सहसा कुणी शिक्षकांच्या संपर्कात रहात असलेले दिसत नाहीये. त्यामुळे ऑनलाईन शाळेपुरताच शिक्षकांचा संबंध राहिला आहे असे दिसून येते. इतर वेळी शाळा सुरू असतात तेव्हा शिक्षक आणि मुले मिळून धमाल गोष्टी देखील करतात. ऑनलाईन शाळेमुळे या गोष्टी कुठेतरी हरवून गेल्यासारख्या वाटतात. मुलांचे हेच दुःख या गाण्यातून सांगण्यात आले आहे.

शाळा ऑनलाईन असली तरी आम्ही तुम्हाला विसरलो नाहीये, हेच मुलांना या गाण्यातून आपल्या शिक्षकांना सांगायचे आहे. मात्र हे गाणं खूपच धमाल आणि विनोदी झालं आहे. त्यामुळे ते ऐकताना फार मजा येते. ‘को’रोनाने शाळा बंद हो झाली, आठवण तुमची लई हो आली… ओ सर, नाही पडणार तुमचा विसर… ओ सर, आहे आमच्यावर तुमचा असर…’ असे या गाण्याचे भन्नाट बोल आहेत.

दोस्तहो, हे गाणं तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. या गाण्याच्या भन्नाट बोलांबद्दल तुमचे काय मत आहे, हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच आमचा हा लेख आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like