एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ओंकारची खऱ्या आयुष्यातली स्वीटू माहितेय का? आहे हि प्रसिद्ध..

झी मराठी वर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. यातली ओम आणि स्वीटू ची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. यामध्ये ओंकार म्हणजेच ओम ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे शाल्व किंजवडेकर. तरुणींच्या स्वप्नातला हा राजकुमार लोकप्रिय झाला नाही तरच नवल!

तर असा हा ओम म्हणजेच शाल्व किंजवडेकर तरुणाईच्या, विशेषतः तरुणींच्या, गळ्यातील ताईत बनला आहे. या हँडसम मुलामुळे सध्या अनेक मुली घायाळ आहेत. स्वप्नातला घोड्यावर बसून येणारा राजकुमार जर खरंच अस्तित्वात असता तर तो नक्कीच आपल्या या शाल्व किंजवडेकर सारखा दिसला असता. मालिकेत जरी ओम स्वीटू वर प्रेम करत असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र अनेक जणी त्याच्यामागे वेड्या आहेत.

शाल्व मूळचा पुण्याचा आहे. शाल्व ने या आधीही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘हंटर’ या चित्रपटापासून शाल्व च्या सिनेसृष्टीतील करिअर ला सुरुवात झाली. त्याने बऱ्याच वेब सिरीज मध्ये देखील काम केलं आहे.

पण मैत्रिणींनो, थोडा स्वतःच्या मनाला यावर घाला. कारण आम्ही जे आता सांगणार आहोत ते वाचून कदाचित तुमचा हार्टब्रेक होऊ शकतो. जशी ओम साठी स्वीटू आहे तशीच शाल्व ची देखील खऱ्या आयुष्यात एक स्वीटू आहे बरं का! या खऱ्या आयुष्यातल्या स्वीटू वर देखील शाल्व चे खूप प्रेम आहे. जवळपास गेली दोन वर्षे शाल्व आपल्या गर्लफ्रेंड बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे श्रेया डाफळापूरकर. श्रेया एक उत्तम मॉडेल आहे. श्रेयाचा स्वतःचा ‘तलम’ फॅशन ब्रँड आहे जो मराठी इंडस्ट्री मध्ये खूप लोकप्रिय आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Daflapurkar (@shreya_daflapurkar)

इकडे पडद्यावर ओम आणि स्वीटू ची लव्हस्टोरी खुलत असताना तिकडे पडद्याबाहेर मात्र शाल्व आधीच श्रेयाच्या प्रेमात पडला होता. दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत असतात. या फोटोंमध्ये दोघेही खूप गोड दिसतात. दोघांची जोडी अगदी शोभून दिसते. श्रेया तिच्या मॉडेलिंग स्किल्स मुळे तर शाल्व त्याच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreya Daflapurkar (@shreya_daflapurkar)

मालिकांप्रमाणेच प्रेक्षक त्यातल्या पात्रांवर आणि ती पात्रं साकारणाऱ्या कलाकारांवर देखील नितांत प्रेम करतात. शाल्व च्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला, त्यातल्या त्याच्या ‘ओम’ या पात्राला आणि खऱ्या आयुष्यात शाल्व ला देखील प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळत राहील हे नक्की. शाल्व ची खऱ्या आयुष्यातली स्वीटू कशी वाटली, हे आम्हाला सांगायला विसरू नका.

You might also like