एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्री आता दिसतात अश्या, करता हे काम..

मराठी चित्रपटसृष्टीने एक काळ असा देखील पाहिला आहे की काही ठराविक अभिनेत्री चित्रपटात असतील तर चित्रपट हिट होणारच. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थिएटर मध्ये खेचून आणण्याचे काम या अभिनेत्रीनी केले आहे. अशाच काही प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत.

१. अलका कुबल
मराठी चित्रपट म्हटलं की सर्वांत आधी आठवतो तो ‘माहेरची साडी’ आणि हा चित्रपट आठवल्यानंतर आपसूकच आठवण होते अलका कुबल यांची. या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग आजही या चित्रपटाची आणि अलका कुबल यांची आठवण काढतात. अनेक चित्रपटांत काम करत अलका कुबल निर्मितीतही उतरल्या. सध्या त्यांची ‘आई माझी काळूबाई’ ही त्यांनी निर्मित केलेली मालिका लोकप्रिय झाली असून यामध्ये त्यांनी आई काळूबाईचं कामही केलं आहे.

२. प्रिया बेर्डे
बऱ्याच मराठी विनोदी चित्रपटांमध्ये प्रिया बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने जान आणली आहे. अशी ही बनवाबनवी, अफलातून, जत्रा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. लक्ष्मीकांत-प्रिया ही खऱ्या आयुष्यातली जोडी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येदेखील झळकली. प्रिया यांनी बऱ्याच गंभीर भूमिकाही केल्या आहेत. चित्रपटांमधील आपल्या कामातून वेळ काढत प्रिया बरंच समाजकार्यही करत असतात. लॉकडाऊन च्या काळात मनोरंजन क्षेत्रातल्या गरजू व्यक्तीना त्यांनी मदत केली आहे.

३. निवेदिता जोशी सराफ
‘अपनापन’ या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरू झालेला निवेदिता यांचा प्रवास अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, थरथराट, आमच्यासारखे आम्हीच या चित्रपटांमधून पुढे सरकत राहिला. अभिनेते अशोक सराफ यांच्याशी लग्न झाल्यावर त्यांनी काही काळ ब्रेक घेतला पण या ब्रेकमध्येदेखील त्यांनी त्यांचा साड्यांचा व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांची ‘आसावरी’ ही व्यक्तिरेखा खूप गाजते आहे. निवेदिता यांच्या पाककृतींचे ‘निवेदिता सराफ रेसिपीज’ हे यूट्यूब चॅनेल देखील आहे.

४. सुकन्या मोने
नाटकांमधली हुकुमाची राणी म्हणजे सुकन्या मोने. सुकन्या यांनी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. आभाळमाया, जुळून येती रेशीमगाठी, चूकभूल द्यावी घ्यावी, कुसुम मनोहर लेले, सरकारनामा, दुर्गा झाली गौरी या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती आहेत. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रेमळ आई आणि सासूच्या भूमिका केल्या आहेत. सध्या त्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत नायकाच्या आईची भूमिका करत आहेत.

या नायिकांनी कधीकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. आश्चर्य म्हणजे त्यांच्या अभिनयाची जादू आजही कमी झालेली नाहीये. विविध नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून त्या आजही प्रेक्षकांना भेटत असतात. अर्थात प्रेक्षकही त्यांना परत पाहून तेवढेच खूष आहेत.

You might also like