एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कधीकाळी लोकप्रिय असलेल्या या मराठी अभिनेत्री आता कुठे आहेत? ब्रेक नंतर करतात हे काम..

तरुणपणी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या बऱ्याच अभिनेत्री नंतर दिसेनाशा होतात. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या आपलं अभिनयावरचं प्रेम जपत काम करत राहतात. कितीही संकटं आली किंवा त्यांना आपल्या करिअर मधून ब्रेक घ्यावा लागला तरी या अभिनेत्री अभिनयाच्या ओढीपायी परत या क्षेत्राकडे वळतात आणि त्यात पुन्हा यशस्वीदेखील होऊन दाखवतात. चला तर भेटूया अशाच काही मराठी अभिनेत्रीना.

१. वर्षा उसगावकर
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका बजावणाऱ्या वर्षा उसगावकर अजूनही तितक्याच सुंदर दिसतात. हमाल दे धमाल, गंमत जंमत, अफलातून, दुनियादारी हे त्यांचे काही गाजलेले मराठी चित्रपट. ‘मराठी तारका’ या कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. मालिका, चित्रपट आणि रंगमंच या सर्व माध्यमांत हुकूमत गाजवणाऱ्या वर्षा यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमध्येदेखील काम केले होते. सध्या त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत लक्षवेधी भूमिका करत आहेत.

२. ऐश्वर्या नारकर
‘महाश्वेता’ मालिकेतून ऐश्वर्या नारकर यांना प्रसिद्धी मिळाली. पुढे अनेक मालिका, चित्रपटात आणि नाटकांतून त्यांचा प्रवास पुढे सरकत राहिला. या सुखांनो या, समांतर, तिघी, ओळख, झुळूक, घे भरारी, सून लाडकी सासरची, गंध निशिगंधाचा, घर की लक्ष्मी बेटीयां या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती. ‘सोयरे सकळ’ या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला आहे. सध्या त्या ‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत नायिकेच्या सासूची भूमिका करत आहेत.

Third party image reference

३. मृणाल कुलकर्णी
‘सोनपरी’ आणि ‘अवंतिका’ या मालिकांमधून मृणाल कुलकर्णी हे नाव घराघरांत पोचले. राजा शिवछत्रपती, फर्जंद, स्वामी अशा ऐतिहासिक कलाकृतींमध्येदेखील आपल्याला त्यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करता करता मृणाल यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले. लॉकडाऊन मध्ये त्यांची आणि त्यांचे पती रुचिर कुलकर्णी यांची चहाची जाहिरात बरीच गाजली होती.

Third party image reference

४. रेणुका शहाणे
‘हम आपके है कौन’ हा चित्रपट बऱ्याच कारणांनी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. त्यातली लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे रेणुका शहाणे यांची प्रेमळ वहिनीची भूमिका. चित्रपटांबरोबरच रेणुका यांनी सूत्रसंचालन क्षेत्रातही बरेच नाव कमावले आहे. ‘सुरभी’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांनी सर्कस, इम्तिहान यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्या बऱ्याच चित्रपटातदेखील झळकल्या आहेत. बदलत्या काळाबरोबर आता त्या वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्येदेखील काम करतात. सायलेंट टाइज, एक कदम, व्हॉट द फोक्स ही त्यातली काही उदाहरणं. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी जज म्हणूनही काम पाहिले आहे.

Third party image reference

५. अश्विनी भावे
‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अश्विनी भावे यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिका, नाटक आणि चित्रपटांतून काम केले आहे. तसेच त्या उत्तम लेखिकादेखील आहेत. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या पण काही निवडक कलाकृतींमधून त्या आपल्या भेटीस येत राहिल्या. द रायकर केस, मांजा, ध्यानीमनी ही त्यातली काही उदाहरणं.

Third party image reference

तर मित्रहो, या अभिनेत्रीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला जरूर कळवा.

You might also like