एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अरविंद त्रिवेदी नाही तर अमरीश पुरी होते ‘रावणाच्या’ भूमिकेसाठी रामानंद सागर यांची पहिली पसंती, मग झाले असे काही की…

कलाकारांचे आयुष्य खूप व्यापाणी भरलेले असते त्यांना एका रोलसाठी किती तरी ऑडिशन द्यावी लागत असतात स्टारडम जरी नसला तरी कलाकारांना त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या संक’टांना सामोरे जावे लागत असते. एखादा रोल मिळतो पण त्याआधी तो रोल कोणासाठी तरी ठेवला गेला असतो पण त्यांच्या अनुपस्थितीत तो रोल दुसऱ्याला जातो तेव्हा तो दुसरा व्यक्ती त्या रोलची चांदी करतो. तेव्हा मात्र निर्माते आणि दिग्दर्शक प्रचंड खुश होतात. कधीकधी स्टारडम व्यक्तिरिक खऱ्या रोल फिट असणाऱ्या कलाकाराला तो रोल द्यावा लागतो. आणि त्या संधीचे सोने करणे हे स्वतःवर असते. अशीच एक घटना आम्हाला मिळाली आहे जी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री मुंबईत नि’ध’न झाले. मीडिया रिपोर्टनुसार, अरविंद त्रिवेदी हे बराच काळ आजारी होते आणि हृदय’विका’राच्या झटक्याने त्यांचे नि’ध’न झाले आहे. त्यांचे अंतिम संस्कार बुधवारी सकाळी मुंबईत होणार आहेत.

ते ८३ वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदींना रामायणातील ‘रावण’ या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांमध्ये खूप ओळख मिळाली. २०२० मध्ये, रामायण पुन्हा टीव्हीवर प्रसारित करण्यात आले, त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्धीच्या झोतात आले. १९८७ मध्ये प्रथमच रामायण प्रसारित झाले होते. २०२० मध्ये अरविंद त्रिवेदी यांना प्रत्येक वर्गाच्या प्रेक्षकांनी रावण म्हणूण ओळखले. अरविंद त्रिवेदीच्या रावणाच्या भूमिकेची निवड प्रक्रिया कशी झाली याची कथा खूप भन्नाट आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की रामायणातील रावणाच्या भूमिकेसाठी अरविंद त्रिवेदी हे पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी रामची भूमिका करणाऱ्या अरुण गोविलसह सर्व सदस्यांना अमरीश पुरी यांनी हे पात्र साकारावे अशी इच्छा होती. प्रत्येकाचे मत असे होते की तो या पात्रासाठी परिपूर्ण आहे. रामायणाच्या ऑडिशन दरम्यान अरविंद त्रिवेदी गुजराती चित्रपटांमध्ये काम करायचे. रावणाच्या पात्राच्या ऑडिशनसाठी तो विशेषतः मुंबईला आला होता.

ऑडिशनमध्येच रामानंद सागर यांना वाटले की तो रावणाच्या भूमिकेसाठी अरविंद हे परिपूर्ण आहेत. एका मुलाखतीत अरविंद यांनी सांगितले होते की, रामानंद सागर यांना त्यांची देहबोली पाहून समजले होते की ते रावणाच्या भूमिकेसाठी परिपूर्ण आहेत.

रावणासाठी रामानंद सागर एक अभिनेता शोधत होते जो हुशार आणि मजबूत दोन्ही दिसत असावा असा. यानंतर अरविंद त्रिवेदींनी ज्या प्रकारे रावणाची भूमिका साकारली ती ऐतिहासिक ठरली. आजही कोणीही अरविंद त्रिवेदीना रावण म्हणून ओळखले जाते. आमच्या टीमकडून अरविंद त्रिवेदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ओम शांती.

You might also like