एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेच्या पत्नीविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? दिसते खूपच सुंदर..

“कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण…” हे शब्द ऐकले की लगेच महाराष्ट्राला चाहूल लागते ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सुरू झाल्याची. हे शब्द म्हणणाऱ्या आवाजाने खरंतर या शब्दांना ती प्रसिद्धी दिली आहे. निलेश साबळे हे त्या आवाजाचं नाव. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ते ‘चला हवा येऊ द्या’ असा त्याचा प्रवास अत्यंत रोमांचक आणि तितकाच प्रेरणादायी आहे.

‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा शो जिंकल्यानंतर निलेश ला ‘फू बाई फू’ या धमाल विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्यानं आपल्यातल्या लेखकालाही वाट मोकळी करून दिली.

२०१४ मध्ये ‘चला हवा येऊ द्या’ चा प्रवास सुरू झाला आणि निलेशने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली. वेगवेगळ्या कल्पना शोधून काढत आणि कुशल विनोदवीरांच्या साथीने निलेशने ‘चला हवा येऊ द्या’ ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आणि मंचामागे मोकळेपणाने वावरणारा निलेश सोशल मीडिया वर मात्र फारसा दिसत नाही. त्यामुळे त्याच्या खाजगी जीवनाबद्दलचे गूढ कायम आहे. निलेश क्वचितच कधीतरी आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतो.

त्यामुळे लोकांना त्याची आणि त्याची पत्नी गौरी यांची लव्ह स्टोरी जाणून घेण्यात खूपच स्वारस्य असल्याचे दिसते. चला तर जाणून घेऊया निलेश साबळे नावाच्या या बहुगुणी कलाकाराबद्दल आणि त्याच्या लव्ह स्टोरी बद्दल.

डॉ. निलेश साबळे एम एस (आयुर्वेद) पदवीधर आहे. मात्र या क्षेत्रात त्याला फारसा रस नव्हता. निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता. तेव्हा त्या दोघांची तिथे ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. ही मैत्री पुढे जाऊन प्रेमाने बहरली. निलेशच्या अभिनय प्रेमाबद्दल गौरी जाणून होती. त्याबद्दल तिची काहीच हरकत नव्हती. अखेर २०११ मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले.

निलेशच्या करिअरची सुरुवात झाली तेव्हा गौरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. गौरी पदवीधर आहे. निलेशच्या प्रत्येक निर्णयात ती त्याला साथ देते. गौरी अभिनय क्षेत्रात नसली तरी तिला मराठी नाटकं आणि मालिका बघायला आवडतात.

गौरी देखील सोशल मीडिया वर फारशी ऍक्टिव्ह नसते. या दोघांचेही फारसे फोटो सोशल मीडिया वर उपलब्ध नसल्याने त्यांचा एखादा जरी नवीन फोटो मिळाला, तरी तो लगेच सोशल मीडिया वर व्हायरल होतो. ‘होम मिनिस्टर’ सारख्या कार्यक्रमामुळे या दोघांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी चाहत्यांना जाणून घेता आल्या.

You might also like