एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील नाम्या खऱ्या आयुष्यात आहे असा! रिऍलिटी शो मध्ये देखील केले आहे काम..

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या प्रचंड गाजते आहे. मालिकेची कथा ही सत्यघटनेवर आधारित असून मालिकेतले कलाकार या कथेतल्या भूमिका जिवंत करण्यात यशस्वी झाले आहेत. या कथेतले गूढ आणि थरार दिवसेंदिवस आपल्याला वाढतानाच जाणवतो आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त आहे.

या मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. मालिकेतील मध्यवर्ती भूमिका ही निगेटीव्ह असली तरी या मालिकेचा प्रेक्षकवर्ग बराच मोठा आहे. श्वेता शिंदेने ‘वज्र प्रोडक्शन्स’ या बॅनर खाली या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेतील मध्यवर्ती व्यक्तिरेखेचे नाव आहे डॉ. अजितकुमार देव.

पेशाने हा माणूस डॉक्टर असला तरी लोकांना फ’सवणे, त्यांना लुबा’डणे आणि प्रसंगी वाटेत येणाऱ्या याच लोकांचा शिताफीने का’टा काढणे हे खरे तर या डॉक्टरचे काम. आपल्या खोट्या डॉक्टरकीच्या बुरख्याखाली डॉ. अजितकुमार देव लोकांचा विश्वास संपादन करतो. वेगवेगळ्या मुलींना प्रे’माच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फ’स’वणूक करतो. ज्यांना ज्यांना त्याचे खरे रूप समजले आहे अशा लोकांचा जीव घेण्यासही तो मागेपुढे बघत नाही.

या मुख्य पात्राभोवती अनेक पात्रे आहेत जी या कथेत रंग भरतात. काही त्याच्या या खोटेपणाला बळी पडतात, तर काही हा खोटेपणा उघड करण्याचा प्रयत्न करतात. याच पात्रांमध्ये एक पात्र आहे नाम्याचं. नाम्या-बज्याची जोडी या मालिकेत बरीच फेमस आहे. यातल्या नाम्याची व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे निलेश अशोक गवारे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nilesh Ashok Gaware (@nileshgaware04)

निलेशने आपले शिक्षण कल्याणच्या बिर्ला कॉलेज आणि के एम अग्रवाल कॉलेज मधून पूर्ण केले आहे. सध्या कल्याण मध्ये रहात असलेला हा कलाकार मूळचा नाशिकचा आहे. खऱ्या आयुष्यात हा कलाकार वागायला-बोलायला एकदम सरळ आणि साधा आहे. त्याने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. ‘जो तेरा है वो मेरा है’ हे त्यातलंच एक नाटक. सोनी मराठी या वाहिनीवर लागणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातही निलेशचा सहभाग होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nilesh Ashok Gaware (@nileshgaware04)

मालिकांमध्ये छोट्या छोट्या व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या कलाकारांबद्दल प्रेक्षकांना फारच थोडी माहिती असते. प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकाराबद्दल नवनवीन माहिती मिळत रहावी हा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी आमचे आर्टिकल्स नक्की व्हिजिट करा. आमच्या आर्टिकल्स वर तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि आठवणीने आमचे आर्टिकल्स लाईक आणि शेअर करा.

You might also like