एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ब्रेकिंग न्यूज! गाडीच्या नंबरवरून बातमी, आत्ताच करा या गोष्टी नाहीतर येऊ शकता तुम्ही खूप अडचणीत..

जलदगतीने सर्व क्षेत्रात बदल होताना दिसत आहेत पटकन आदेश देऊन त्यावर अंमलबजावणी केली जात आहे माणसांच्या सुखकारक आयुष्यात दररोज नवनवीन अडचणी येत आहेत. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन घोषणा केली आहे, मागील १ एप्रिल २०१९ मध्ये वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले होते. हा एक प्रकारचा कोड आहे जो केंद्रीय मंत्रालयाच्या प्रणालीशी जोडला गेलेला असतो. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्वरित त्या गाडीबद्दल व इतरत्र सर्व माहिती क्षणात मिळून जाते.

हा निर्णय अमलात आणून सुमारे पावणेदोन वर्षतरी लोटली गेली तरीही आजही या गोष्टीचा विचार सामान्य जनता करत नसल्याचे समोर येत आहे, वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक सरकारने घेतलेला योग्य निर्णय होता पण याची अंमलबजावणी आजही जनता करत नसल्याचे दिसून येत आहे. अजूनही खूप साऱ्या वाहनांना ‘हाय सेक्युरिटी नंबर प्लेट’ नसताना दिसून येत आहे. ही नंबर प्लेट खूप गरजेची आहे ती कोणत्या पध्दतीने लावली जाते हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

हाय सेक्युरिटी नंबर प्लेटवर प्रामुख्याने होलोग्राम स्टिकर असते ज्यावर वाहनांचे इंजिन व चेसी नंबर असतो. वाहनांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही नंबर प्लेट तयार केलेली आहे. हा नंबर प्रेशर मशीन द्वारा लिहला जात असतो.

जर तुम्ही हे केले नाही तर ही तुमची कामे होणार नाहीत..

१) वाहनांच रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
२) वाहनांच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकंड कॉपी
३) पत्ता बदल
४) रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन
५) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट
६) हायपोथकेशन कॅन्सेलेशन
७) हायपोथेकेशन एंडोर्समेंट
८) नवं परमिट
९) टेम्पररी परमिट
१०)स्पेशल परमिट
११)नॅशनल परमिट

हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला दोन संकेतस्थळ भेटतील. ज्यावर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया करता येईल, यासाठी तुम्हाला https://bookmyhsrp.com/index.aspx या वेबसाईटवर जावे लागेल, यावर प्रवेश केला की तुम्हाला खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला खासगी व्हेईकल टॅबवर क्लिक करावे लागेल मग पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी (CNG) आणि CNG+पेट्रोल यापैकी तुम्हाला एक पर्याय वर क्लीक करावे लागेल, पेट्रोल टाईप टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला वाहनांची विविध कॅटेगरी तुमच्यासमोर खुलून ओपन होईल. ज्यात बाईक, कार, स्कूटर, ऑटो असे वेगवेगळे पर्याय दिसतील, ज्यात तुम्हाला थोडीफार माहिती भरावी लागेल.

गाडीवर फक्त रजिस्ट्रेशन स्टिकर लावायचे असल्यास तुम्हाला पुढील लिंकला भेट द्यावी लागेल. https://www.bookmyhsrp.com/ तुमच्या गाडीच्या इंधनानुसार तुम्हाला वेगवेगळे स्टिकर दिले जातील. Source:spreaditnews

You might also like