एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

झी मराठी वरील ‘मन झालं बाजिंद’, या मालिकेतील राया आहे तरी कोण? खऱ्या आयुष्यात आहे..

मित्रहो हल्ली छोट्या पडद्यावर अनेक वेगवेगळ्या कथानक असणाऱ्या मालिका प्रदर्शित होत आहेत, प्रत्येक मालिकेचे कथानक खूप रंजक वाटते. त्यातच काही रहस्य दडवून ठेवणाऱ्या मालिका देखील आहेत. हिंदी सह मराठी टेलिव्हिजन वर सुद्धा अनेक मनोरम मालिका पाहायला मिळतात, या मालिकांमुळे रसिकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन होत असते.

प्रेक्षकांना इतकी त्यांची सवय लागते की त्या मालिका पाहिल्याशिवाय दिवस सरत नाही. बघता बघता या मालिका प्रेक्षकांना घरच्या वाटू लागतात त्यामुळे त्यांच्यात सहज मन गुंतत राहते. त्यातील कलाकार आपलेसे होतात, त्यांचा अभिनय, त्यांनी साकारलेल्या भूमिका सर्वकाही मनात घर करून जाते.

मालिकांचा विषय निघाला की झी मराठी वरील सर्व अतरंगी मालिका आठवतात, या वाहिनीवरील सर्व मालिका खूप छान आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर या मालिकांचे कौतुक होत असते, शिवाय यातील कलाकार देखील चांगलेच लोकप्रिय बनतात. प्रत्येक वेळी या मालिकांमध्ये काही तरी नवीन पाहायला मिळते, शिवाय काही मालिका तर रहस्यमयीच आहेत त्यामुळे झी मराठीचे प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात आणि त्यांची उत्सुकता कधीच व्यर्थ जात नाही.

हल्ली झी मराठीचे प्रेक्षक येणाऱ्या नव्या मालिकेसाठी खूप उत्सुक असून या मालिकेत आता कोण कोण नवे कलाकार झळकणार याची खात्री करून घेण्याच्या नादात सर्वजण गुंतले आहेत.

झी मराठीवर येणारी ही नवी मालिका “मन झालं बाजिंद” याचा प्रोमो पाहून रसिक निम्मे प्रेमात पडलेत या मालिकेच्या, जेव्हा पूर्णपणे सुरू होईल तेव्हा तर प्रेक्षकवर्ग या मालिकेत खूप गुंतून जाईल हे नक्की आहे. या मालिकेचा प्रोमो तर जबरदस्तच आहे, यातील कलाकार आणि त्यांची भूमिका तसेच त्या भूमिकेची वेशभूषा पाहून प्रेक्षक आकर्षित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SHWETA RAJAN KHARAT (@shwetarajan_)

या मालिकेचे कथानक काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे, मालिकेतील नायक आणि नायिका पाहून चाहता वर्ग खूपच खुश आहे. मालिकेतील हे मुख्य दोन पात्र अनेकांना आवडतात आणि त्यातील राया तर सोशल मीडियावर देखील खूप लोकप्रिय आहे.

या मालिकेद्वारे राया आणि कृष्णाची प्रेमकथा चांगलीच रंगवली जाणार आहे, ही प्रेमकथा आता लवकरच रसिकांच्या भेटीस येणार असून आता झी मराठीच्या प्रेक्षकांचे पुन्हा नव्याने विशेष मनोरंजन होणार आहे. या मालिकेत राया च्या भूमिकेत दिसणार आहे श्वेता राजन आणि कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे वैभव चव्हाण. या दोघांची केमिस्ट्री खूप छान असणार आहे, त्यांची जोडी आतापासूनच चाहत्यांना फार आवडली आहे.

कृष्णा आणि राया दिसायलाही खूप गोड आहेत, त्यांची निरागसता ही त्यांच्या प्रेमाला विशेष सजवते. प्रोमो मधूनच त्यांनी चाहत्यांना आकर्षित केले आहे आता मालिका सुरू झाल्यावर हे भरपूर लोकप्रिय होणार हे पक्के.

रायाच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री श्वेता राजन हिला आपण सर्वजण ओळखतो, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. “लागीर झालं जी” मधील अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाणच्या डान्स व्हिडीओ मध्ये श्वेता नेहमीच दिसून येते त्यामुळे सोशल मीडियावर देखील भरपूर लोक तीला ओळखतात, तीचे चाहते आहेत आणि आता ती मालिकेतून आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SHWETA RAJAN KHARAT (@shwetarajan_)

तसेच याआधी तीला “राजा राणीची ग जोडी” या मालिकेतील संजीवनी, तीची बेस्ट फ्रेंड म्हणजेच मोनाच्या भूमिकेत देखील आपण पहिलेच असेल. आता पुन्हा ही श्वेता राजन खरात ” मन झालं बाजिंद” या मालिकेत झळकणार आहे.

“घेतला वसा टाकू नको” या मालिकेतही भगवान शंकर यांच्या पौराणिक कथेमध्ये श्वेताला महालक्ष्मीची भूमिका मिळाली होती. या भूमिकेतून देखील तीने खूप लोकप्रियता मिळवली होती. श्वेता दिसायला खूप सुंदर आहे त्यामुळे तिच्यावर कोणतीही भूमिका खुलून दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by SHWETA RAJAN KHARAT (@shwetarajan_)

शिवाय ती एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे, जेवढी ती पडद्यावर सुंदर दिसते तेवढीच ती खऱ्या आयुष्यात देखील रूपवान आहे. तीची निरागसता सहज कोणालाही आकर्षित करते म्हणून तर तीचे अनेक लोक चाहते आहेत. श्वेताला ही नवी रायाची भूमिका मिळाल्याबद्दल तीचे खूप अभिनंदन. तसेच तीला भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like