एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मैं पानी पानी हो गयी’ वर नेहा खानचे ठुमके! या अभिनेत्रीचे हे हॉ’ट जलवे होत आहेत व्हायरल..

झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ मालिकेतील पात्रे आता लोकांच्या घरच्यांसारखीच झाली आहेत. या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने आपली अशी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत नव्याने एन्ट्री होणाऱ्या व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. अशीच एक व्यक्तिरेखा आहे एसीपी दिव्या सिंग ची. डॉ. अजितकुमारची वरात थेट लग्नमंडपातून जेलमध्ये नेणाऱ्या दिव्या सिंग ची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली आहे. ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री नेहा खान ने.

नेहा खान एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नेहा मराठी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते. मूळची अमरावतीची असलेली नेहा इयत्ता आठवीत असल्यापासूनच मॉडेलींग स्पर्धांमध्ये भाग घेत होती. वयाच्या १५ व्या वर्षी तिने ‘प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र’ ही स्पर्धा जिंकली होती. २०१४ ला नेहा मुंबईला गेली. तिथे तिने अनुपम खेर ऍक्टिंग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतले. २०१५ मध्ये तिला ‘बॅड गर्ल’ या हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

नेहा सोशल मीडिया वर खूपच सक्रीय असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले असता लक्षात येते की ती आपले वेगवेगळ्या पोज मधले फोटो पोस्ट करत असते. तसेच तिने अनेक गाण्यांवर नृत्य करत असल्याचे व्हिडिओ देखील इंस्टाग्राम वर अपलोड केले आहेत. तिने २०१९ मध्ये ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स स्पर्धेतही भाग घेतला होता. तिच्या फोटो आणि डान्स व्हिडिओ ना तिच्या चाहत्यांची खूप पसंती मिळत असते.

सध्या तिचा ‘मैं पानी पानी हो गयी’ या गाण्यावरचा डान्स व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. लाल ड्रेस मध्ये तिने केलेला हा डान्स तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यात यशस्वी झाला आहे. तिच्या लाजवाब ठुमक्यांवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे. तसे तर तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ वर तिचे चाहते लाईक आणि कमेंट करत असतात. पण या व्हिडिओ ला लोकांची विशेष पसंती मिळत असल्याचे दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial)

एसीपी दिव्या सिंग चा बदललेला अवतार तुम्हाला कसा वाटतो मंडळी? तुमची फेवरेट कोण- युनिफॉर्म मधली एसीपी दिव्या सिंग की विविध गाण्यांवर मस्त डान्स करणारी नेहा खान? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like