एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हि प्रसिद्ध अभिनेत्री झाली दुसऱ्यांदा आई, झाली पुत्ररत्नाची प्राप्ती..

अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी या स्टार जोडप्याने यावर्षीच्या जुलै मध्ये नेहा पुन्हा गरो’दर असल्याची बातमी दिली होती. नुकतीच त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याची पोस्ट अंगदने सोशल मीडिया वर शेअर केली आहे. नेहाचा आणि त्याचा फोटो टाकत त्याने चाहत्यांना त्यांना मुलगा झाला असल्याची गोड बातमी दिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANGAD BEDI (@angadbedi)

अंगदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर नेहाचा आणि त्याचा फोटो टाकला आहे. हा फोटो नेहाच्या प्रेग्नन्सी फोटोशूट पैकी एक आहे. या फोटोला कॅप्शन टाकत अंगदने ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे, की “बेदीज् बॉय इज हिअर! परमेश्वर कृपेने आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. नेहा आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. मेहर आता आपली ‘बाळ’ ही पदवी नव्या पाहुण्याकडे सुपूर्द करायला सज्ज आहे. परमेश्वराची आमच्यावर अशीच कृपा राहो. या सगळ्या प्रवासात खूप खंबीर राहिल्याबद्दल, नेहा, मी तुझा आभारी आहे. आपल्या चौघांसाठी हे क्षण आपण अविस्मरणीय बनवून टाकू.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

नेहा आणि अंगदने १० मे २०१८ ला लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही महिन्यातच नेहाने तिच्या गरोदरपणाची बातमी दिली होती. नेहा लग्नाआधीपासूनच गरोदर असल्याच्या बातम्या येत होत्या. १८ नोव्हेंबर २०१८ रोजी तिने कन्यारत्नाला जन्म दिला. तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. नेहा आणि अंगदच्या लग्नाच्या चार वर्षं आधी अंगदने नेहाला प्रपोज केलं होतं. पण त्यावेळी नेहा दुसऱ्या कोणाबरोबर तरी रिलेशनशिपमध्ये होती.

नेहाचं त्यानंतर ब्रेकअप झालं. नंतरच्या काळात नेहा आणि अंगद जवळ आले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचा अंगद हा मुलगा आहे. अंगदने पदार्पणात क्रिकेट मध्ये खूप नाव कमावले होते. त्यानंतर तो मॉडेलिंग कडे वळला. पुढे मॉडेलिंग करता करता त्याने अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली.

२००२ मध्ये नेहाने ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ चा किताब जिंकला आहे. नेहा धुपियाने २००३ मध्ये ‘कयामत’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अंगदने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फालतू’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. त्याने पिंक (२०१६), डिअर जिंदगी (२०१६), टायगर जिंदा है (२०१७) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मुलाच्या येण्याने नेहा आणि अंगदला पुन्हा आई-बाबा होण्याचा आनंद प्राप्त झाला आहे. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

You might also like