एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भारत सोडून आता दुबईला शिफ्ट होत आहे नवाजुद्दीन सिद्दीकीचे संपूर्ण कुटुंब, पत्नी आलियाने सांगितले कारण..

भारतातील ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांवरती वाईट परिणाम होतोय, म्हणून दुबईला शिफ्ट होतोय..

येणारा प्रत्येक दिवस बॉलिवूड मधली काहीतरी नवीन बातमी घेऊन येत असतो. मध्यंतरी बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घट’स्फो’टाची चर्चा होती. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यात वा’द सुरू होते. आता मात्र हे वा’द मिटल्याची चर्चा आहे. दोघांमधले वा’द संपून त्यांच्या मधला दुरावा आता संपुष्टात आला आहे. दोघेही आता आनंदाने एकत्र रहात असल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान नवाजचे कुटुंब भारत सोडून जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांचे कुटुंब भारत सोडून दुबईला स्थलांतरीत होणार असल्याचे कळते. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने याबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ला मुलाखत देताना खु’लासा केला आहे. ती म्हणाली, “हो, हे खरे आहे की आम्ही दुबईमध्ये शिफ्ट होत आहोत. दुबईमध्ये गेल्यावर आमची दोन्ही मुले शोरा आणि यानी तिकडेच शिक्षण घेणार आहेत.”

दुबईला शिफ्ट होण्याचे कारणही आलियाने पुढे सांगितले आहे. भारतात सध्या ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. येत्या काही वर्षांत असेच चित्र राहणार असल्याचे दिसत आहे, असेही आलीया म्हणाली. त्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांनी दुबईच्या शाळेत टाकले आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना मुले नेहमी घरीच असतात.

घरातील वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होतो. अशावेळी घरातले वातावरण ठीक नसेल तर मुले अभ्यासावर आपले लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. “शाळेत जाऊन घेतलेले शिक्षण हे फार वेगळे असते. आम्ही लवकरात लवकर दुबईला जाण्याचा प्रयत्न करत आहोत.” असेही आलियाने सांगितले.

सध्या नवाजुद्दीन आणि त्याचे कुटुंबीय कसारा येथील फार्महाऊस वर एकत्र वेळ घालवत आहेत. आलिया आणि मुलांना दुबईला सोडून नवाज पुढे लंडनला जाणार आहे. लंडनला त्याच्या ‘हिरोपनती २’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. त्यासाठी तो लंडनला जाणार आहे. ‘हिरोपनती २’ या चित्रपटात नवाजुद्दीन बरोबर अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारीया देखील प्रमुख भूमिकेत काम करत आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.

नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अष्टपैलू अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ब्लॅक फ्रायडे (२००७), गँग्स ऑफ वासेपूर (२०१२), तलाश (२०१२), द लंचबॉक्स (२०१३), बजरंगी भाईजान (२०१५), मांझी (२०१५), रमण राघव २.० (२०१६), ठाकरे (२०१९) या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये आपण नवाजुद्दीन सिद्दिकीच्या अप्रतिम अभिनयाची झलक पाहिली आहे. सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्स सिरीज मध्ये देखील नवाजने काम केले आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.

You might also like