एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नवरीबाई थिरकल्या दिरांच्या तालावर! लग्नातला हा व्हिडिओ होतोय सध्या प्रचंड व्हायरल…

लग्न म्हटलं की मग आली धमाल, मस्ती, डान्स आणि मनोरंजन देखील. नवरा-नवरी साठी जरी हा खास क्षण असला तरी बाकीचे लोक देखील तेवढीच धमाल करतात. लग्न म्हणजे केवळ नवरा आणि बायकोचे नाते नसते. या लग्नात अनेक नातेसंबंध जुळतात. वहिनी आणि दिराचं नातं देखील या सोहळ्यामळे जुळत असतं.

हे नातं तसं विशेषच आहे. एका लग्नात हेच नातं खूप विशेष पद्धतीनं दिसून आलं. लग्नातली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे डान्स. वहिनी, दीर आणि डान्स या गोष्टी एकत्र आल्या की काय धमाल होते हे एका लग्नात पाहायला मिळाले. या लग्नातला हा व्हिडिओ सोशल मीडिया वर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओ मध्ये दीर मस्त डान्सच्या मूड मध्ये दिसत आहेत. डान्स करण्यासाठी सगळे दीर जमले आहेत आणि त्यांनी डान्सला सुरुवात देखील केली आहे. डान्स करता करता सगळ्या दिरांनी नवरा आणि नवरीला आपल्यासोबत डान्स करायला बोलावलं. नवऱ्याने डान्स करायला सुरवात देखील केली.

लगेच नवरीनेही उत्साहाने यात भाग घेतला आणि तिचीही पावलं थिरकू लागली. सगळ्यांनीच एका धमाल गाण्यावर मस्त डान्स करत आपलं बॉन्डींग किती जबरदस्त आहे हे दाखवून दिलं. या सगळ्यांना एकत्र डान्स करताना पाहून लग्न म्हणजे धमाल मस्ती याचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही.

‘द वेडिंग राईड इंडिया’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ ला १५ हजार पेक्षा जास्त लाईक्स आहेत. तसेच ९० हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोकांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वर बराच व्हायरल होत आहे. ‘द वेडिंग राईड इंडिया’ या इंस्टाग्राम अकाऊंट वर असेच अनेक लग्नाचे आणि लग्नातल्या गमतीजमतींचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले जातात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Wedding Ride India❤❤ (@theweddingrideindia)

असेच काही धमाल व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काम करतो. तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत. आमच्या लेखांमधून मनोरंजन सृष्टीतल्या आणि अशाच काही मनोरंजनात्मक बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. असे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देऊन आमचे लेख नक्की वाचा. तुम्हाला आवडलेले लेख जरूर लाईक करा. तसेच तुमचे आवडते लेख तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

Source: insta/The Wedding Ride India

You might also like