एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नटू काकांची ‘ती’ इच्छा अपूर्णच! अखेरच्या क्षणापर्यंत करायचे होते हे…

काल (३ ऑक्टोबर) ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील नटू काका म्हणजेच घनश्याम नायक यांनी या जगाचा निरोप घेतला. गेले काही महिने ते क’र्क’रोगाशी झुंज देत होते. अखेर ही झुंज अपयशी ठरली आणि नटू काका केवळ गोकुळधाम सोसायटीलाच नाही, तर प्रेक्षकांनाही पोरकं करून गेले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

क’र्क’रोगावरील उपचारादरम्यान घनश्याम नायक यांचा मृ’त्यू झाला आहे. घनश्याम नायक ७७ वर्षांचे होते. मात्र सत्तरी पार करूनही त्यांचा पडद्यावरचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता. त्यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील नटू काका या भूमिकेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. घनश्याम नायक यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. बेटा, क्रांतिवीर, बरसात, घातक, लाडला, चायना गेट, लज्जा, खाकी, तेरे नाम, हम दिल दे चुके सनम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

आपल्या कामाविषयी त्यांना खूप आस्था होती. काही दिवसांपूर्वीच ‘ई टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत ते आपल्या उपचाराबद्दल आणि कोरोना परिस्थितीबद्दल बोलले होते. “मी ठीक आहे. हा काही फार मोठा मुद्दा नाही. खरं तर उद्या तुम्ही मला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या भागात पाहू शकणार आहात. हा विशेष भाग असणार आहे आणि प्रेक्षकांना माझं काम आवडेल,” असं ते म्हणाले होते.

त्यांनी पुढे सांगितले, की “गेल्या वर्षीपासून को’रो’नामुळे परिस्थिती बदलली आहे आणि कोरोना इथेच राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी घाबरेन आणि घरात बसेन. मी सकारात्मक विचार करणारा आहे. मी नि’राश होत नाही किंवा नकारात्मक विचारदेखील करत नाही. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे.”

घनश्याम यांचे त्यांच्या कामावरचे प्रेम आणि श्रद्धा खरंच कौतुकास्पद आहे. आजपर्यंत त्यांनी प्रेक्षकांचे जे मनोरंजन केले, त्याला तोड नाही. मात्र दुर्दैवाने त्यांची अखेरची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकलेली नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करत चेहऱ्यावर आपल्या कामाची निशाणी असताना अखेरचा श्वास घेणं अखेर त्यांच्या नशिबातच नव्हतं, असंच आता म्हणावं लागेल. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच देवाकडे प्रार्थना!

You might also like