एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘पक पक पकाक’ मधील साळू आठवते का? आता दिसते अशी..केलय परदेशी व्यक्तीशी लग्न

२००५ मध्ये ‘पक पक पकाक’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. सामाजिक संदेश देत या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. बऱ्याच ठिकाणी वस्तुनिष्ठ विनोद करत, तर अनेकदा वैचारिक संवादांनी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा करून ठेवली.

या चित्रपटात नाना पाटेकर यांनी ‘भुत्या’ ची भूमिका साकारली होती, तर बालकलाकार सक्षम कुलकर्णी ‘चिखलू’ च्या भूमिकेत दिसला होता. गौतम जोगळेकर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात उषा नाडकर्णी, प्राची शाह, ज्योती सुभाष, जितेंद्र जोशी असे तगडे कलाकार देखील होते. अजून एक कलाकार या चित्रपटात होती, जिने हिंदी मनोरंजन सृष्टीत खूप काम केलं आहे.

या अभिनेत्रीचं नाव आहे नारायणी शास्त्री. ‘पक पक पकाक’ चित्रपटात तिने ‘साळू’ ची भूमिका साकारली होती. नारायणी शास्त्री हे हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध नाव आहे. तिने रंगभूमीवरही बरंच काम केलं आहे. १६ एप्रिल १९७४ रोजी नारायणीचा जन्म झाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Narayani Shastri (@narayanishastri)

नारायणी मूळची पुण्याची आहे. पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई मधील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबई नावाच्या स्वप्ननगरीने तिला अभिनयाचे स्वप्न दाखवले आणि नारायणीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

‘क्यूँ कि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने कुसुम, पिया का घर, कोई अपना सा, ममता, नमक हराम, पिया रंगरेझ, रिश्तो का चक्रव्यूह, कर्ण संगिनी यांसारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये कामे केली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Narayani Shastri (@narayanishastri)

तिच्या या मालिकांमधील भूमिका खूप गाजल्या. सध्या ती ‘आपकी नजारों ने समझा’ मालिकेत ‘राजवी’ ची भूमिका साकारत आहे. तिने काही चित्रपट आणि ‘गंदी बात’ (२०१८) व ‘नक्षलबारी’ (२०२०) सारख्या वेब सिरीज देखील केल्या आहेत.

हिंदी मालिकांमध्ये काम करत असली तरी नारायणीचे मराठी देखील चांगले आहे. २०१५ मध्ये तिने तिचा परदेशी बॉयफ्रेंड स्टीव्हन ग्रेव्हर बरोबर लग्न केले. तिच्या या लग्नाबद्दल बरेच दिवस कोणालाच कल्पना नव्हती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Narayani Shastri (@narayanishastri)

त्यानंतर मात्र ही बातमी सगळ्यांना समजली. आपल्या लग्नाबाबत सांगताना तिने सांगितले, की “मी माझे लग्न जगजाहीर करणार नव्हते. माझे त्याच्यावर प्रेम होते आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न केले.” सध्या ती आणि तिचा पती मुंबईमध्येच स्थायिक झाले आहेत.

You might also like