एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग ब्रेकिंग! थेट मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली देण्याचं वक्तव्य करणारे नारायण राणे कायद्याच्या गजाआड..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘कानाखाली लावू’ या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडकले आहेत. रत्नागिरी न्यायालयातून अट’कपूर्व जामीन नाकारल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आणि काही काळानंतर त्यांना अ’टक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बहुधा ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राज्य सरकारने एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर अशी कारवाई केली आहे.

नारायण राणेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वा’द’ग्रस्त वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वा’द’ग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणेंविरोधात नाशिक, पुणे आणि महाराष्ट्राच्या महाडमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये IPC कलम 500, 505 (2) आणि 153-B अंतर्गत गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध चौथा गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी हा खटला दाखल केला आहे. कलम 500, 505 (2), 153-B (1) (c) अन्वये गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्पूर्वी, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत ठेवलेल्या नारायण राणे यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आलेले डॉक्टर त्यांचा रक्तदाब वाढल्याचे सांगत आहेत. त्यांच्या वयामुळे आणि मधुमेही असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे आणि ईसीजी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यांची साखरेची पातळी तपासता आली नाही.

नारायण राणे नेमक काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान दावा केला होता की, “देश स्वतंत्र कधी झाला आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले आहेत.” देश कधी स्वातंत्र्य झाला याचे साल विसरल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या सहकाऱ्याला विचारल्याचा दावा देखील नारायण राणेंनी केला आहे.

नारायण राणे म्हणाले होते की, “आपल्याला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही ही प्रचंड लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मागे वळून आपल्या सहकाऱ्याला विचारले. जर मी तिथे असतो तर मी मुख्यमंत्र्यांच्या जोरदार कानाखालीच मारली असती.”

नारायण राणेंच्या अटकेमुळे भाजप भडकला
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विटरद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अ’ट’केवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. जन-आशीर्वाद यात्रेमध्ये भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे हे लोक नाराज आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, प्रवास चालूच राहणार आहे.”

नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही
अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांनी यापूर्वी रत्नागिरी न्यायालयात अ’ट’कपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या तीनही एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. परंतू, त्यांना उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.

You might also like