एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दरड कोसळून घाट बंद! उपचारासाठी पत्नीला खांद्यावरून घेऊन जात असताना वाटेतच मृ’त्यू

पावसाळ्याचा मौसम संपता संपता पुन्हा एकदा पावसाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले आहेत.

काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. पण अशा परिस्थितीमुळे लोकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गावांशी संपर्क तुटल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नंदुरबार मध्ये देखील अशाच एका घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृ’त्यू झाला आहे.

नंदुरबारमधील चांदसैली येथे पावसाने संततधार लावली आहे. पावसामुळे दरड कोसळली आणि रस्ते बंद झाले. दरड कोसळून परिसरातील घाट रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झाला. अखेर केवळ पायवाटच येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहिला. गावातील सिदलीबाई पाडवी या महिला आजारी पडल्या. तब्येत बरीच बिघडली असल्याने रुग्णालयात दाखल करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र रस्ते बंद असल्याने रुग्णालयात जाण्याचा कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता.

अखेर त्यांच्या पतीने पायवाट धरली. आपल्या आजारी पत्नीला खांद्यावर टाकून हे वयस्कर गृहस्थ तिला लवकरात लवकर उपचार मिळावेत म्हणून धडपडू लागले. पत्नीला खांद्यावर टाकून नेट असताना दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचा वाटेतच मृ’त्यू झाला.

त्यांची आयुष्यभराची जोडीदार त्यांची अशी अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेली. उपचारांअभावी सिदलीबाई यांना वाटेतच आपले प्राण गमवावे लागले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृ’त्यू झाला.

जळगावात १३ वर्षीय बालिका मृ’त्युमुखी
नंदुरबार सारखीच एक घटना जळगावात देखील घडली आहे. जळगाव जिल्ह्याला देखील पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसाने बोरी नदीचं पाणी फुगलं, मात्र नदी ओलांडायला पूलच नाही. वर्षानुवर्षे लोक आपला जीव धोक्यात घालून नदी ओलांडत आहेत. पुरामुळे तेही अशक्य झाले. अशातच अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील १३ वर्षीय मुलगी आरुषी सुरेश भिल तापाने फणफणलेली. नदीला पूर आल्याने मुलीला दवाखान्यात नेता येईना अन् डॉक्टरला गावात येता येईना, अशी अवस्था झाली होती.

सकाळी मुलीचा ताप वाढला. प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होते. कसेतरी तिला खाटेवर टाकून नदीकाठी आणण्यात आले. कसेतरी करून नदी ओलांडून तिला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न होता. मात्र दुर्दैव आड आले. झटका येऊन तिचा तिथेच मृ’त्यू झाला. उपचाराअभावी या आदिवासी मुलीला देखील आपले प्राण गमवावे लागले.

You might also like