एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘धरिला पंढरीचा चोर…’ गाण्यातील ही अभिनेत्री ओळखली का? आजही दिसतात तितक्याच सुंदर…

१९८८ साली प्रदर्शित झालेला ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट खूपच प्रसिद्ध झाला. रमाकांत कवठेकरांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यामधील ‘धरिला पंढरीचा चोर…’ हे गाणे तर खूपच गाजले होते. हे गाणे चित्रित झाले होते अभिनेत्री नंदिनी जोग आणि बालकलाकार बकुल कवठेकर वर.

काही वर्षांपूर्वीच बकुल कवठेकरचे निध’न झाले. मात्र त्याने या चित्रपटात साकारलेला विठोबा सर्वांच्याच स्मरणात राहिला. आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री नंदिनी जोग यांच्या बद्दल.

नंदिनी जोग मूळच्या अकोल्याच्या. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. मराठी चित्रपटसृष्टीत त्या सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कळत नकळत (१९८९), दे धडक बेधडक (१९९०), थांब थांब जाऊ नको लांब (१९९०), बंधन (१९९१), वाजवू का (१९९६) या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका निभावल्या.

‘पंढरीची वारी’ चित्रपटात त्यांनी जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांच्या मुलीची म्हणजेच ‘मुक्ता’ ची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये त्यांना अशोक सराफ, विजय कदम यांसारख्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

लग्नानंतर आपल्या कुटुंबाबरोबर नंदिनी पुण्यात स्थायिक झाल्या. त्यांच्या पतीचे नाव अभिजित जोग आहे. अभिजित जोग ब्रँडींग आणि ऍडव्हरटायझिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ‘प्रतिसाद ऍडव्हरटायझिंग’ नावाची पुण्यात ऍडव्हरटायझिंग एजन्सी आहे. ब्रँडींग क्षेत्राशी निगडीत ‘ब्रँडनामा’ नावाचे पुस्तकही त्यांनी लिहीले आहे. नंदिनी आणि अभिजित यांचा मुलगा अनिश जोग हादेखील चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळत नाही. त्यांना कायम सहाय्यक भूमिकेमध्ये समाधान मानावे लागते. मात्र त्यांपैकी काही कलाकार असे असतात जे आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करतात. नंदिनी जोग यादेखील त्यांपैकीच एक. त्यांची ‘पंढरीची वारी’ मधली भूमिका तर लोकांना खूपच भावली. बाकी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकाही लोकांना खूप आवडल्या.

Image: Lokmat.com

काय मग मंडळी, कसा वाटलं आजचा लेख? अशाच कलाकारांबद्दल आंम्ही आमच्या लेखांमधून तुम्हाला माहिती देत असतो. त्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत राहा. ते करण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्यायला विसरू नका. तुम्हाला आवडणाऱ्या कलाकारांबद्दल आम्ही आमच्या वेबसाइट वर अनेक लेख लिहितो. तुम्हाला जे लेख आवडतील ते लाईक करत चला आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like